Maharashtra Din 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din : पुण्यात शिवरायांचे संकल्पना उद्यान, राज्यभर शिवराज्य महोत्सव; राज्यपालांच्या घोषणा!

Sandip Kapde

मुंबई : १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य १ मे रोजी त्यांचा स्थापना दिवस साजरा करतो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.

वास्तविक मराठी आणि गुजराती भाषिक स्वतःसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. त्यासाठी राज्यभर आंदोलनेही होत होती. त्यानंतर १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत अनेक राज्ये निर्माण झाली. दरम्यान आज शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

राज्यपाल बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. बैस यांनी अनेक घोषणा देखील केल्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषकाचे यावर्षी ३५० वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या २ ते ९ जून २०२३ काळात शिवराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार, अशी माहिती बैस यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत संग्रहालय उभारण्यात येईल. तसेत पुण्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा देखील बैस यांनी केली.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, वीर सावरकर यांचा जन्मदिन (२८ मे) राज्यसरकारकडून स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सरकारने १९ फेबृवारी २०२३ मध्ये जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे स्वीकार केले आहे. महाराष्ट्राने कारोनाच्या तीन लाटांचा सामना करत देशासमोर नाव गौरव केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT