SSC Exam
SSC Exam sakal media
महाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणे वाढले; तीन पेपरमध्ये 14 जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी (ssc exam) 'शाळा तिथे परीक्षा केंद्र' (exam center) देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून कॉपीची प्रकरणे (copy cases) समोर येत आहेत. आजपर्यंत झालेल्या दहावीच्या तीन पेपरमध्ये १४ जणांहून अधिक कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra education board) देण्यात आली. राज्यात दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू झाली आहे. ही परीक्षा राज्यात असलेल्या २२ हजार ९९१ शाळांतील ५ हजार ५० मुख्य परीक्षा केंद्रांवर, तसेच १६ हजार ३३५ उपकेंद्रावर घेतली जात आहे.

या परीक्षेला राज्यभरातून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेत राज्य शिक्षण मंडळाने शाळा तिथे परीक्षा केंद्र देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. मात्र त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे प्रशासनालाही अवघड झाले आहे. अनेक शाळांनी आपला निकाल अधिक लागेल म्हणून विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मोकळे रान दिले असल्याने दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रकार वाढले आहेत; तर मुंबईतही गल्लीबोळात असलेल्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र असल्याने कॉपी प्रकरणे जोरात सुरू आहेत.

आत्तापर्यंत दहावीचे मुख्य तीन पेपर झाले असून यामध्ये मराठी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली आणि संयुक्त भाषा मराठी या प्रथम भाषेचे पेपर झाले आहेत. त्यासोबतच पंजाबी (द्वितीय भाषा) भाषेचाही पेपर झाला असून हिंदी भाषेला पर्यायी म्हणून घेण्यात येत असलेल्या कौशल्य विकास या विषयावर आधारित असलेल्या एनएसक्यूएफ आणि आज इंग्रजी विषयाचा पेपर झाला आहे. या पेपरमध्ये राज्यभरातून १३ प्रकरणे समोर आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

कॉपी प्रकरणे आटोक्यात

राज्यात कॉपी प्रकरणावर आळा घालण्यासाठी मंडळाकडून भरारी पथके, पर्यवेक्षक देण्यात आले आहेत. स्थानिक स्तरावर जिल्हाधिकारी आणि प्रशासन यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करत असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मोबाईल आणण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. शिवाय एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आल्याने कॉपी प्रकरणे आटोक्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT