education education
महाराष्ट्र बातम्या

‘शिष्यवृत्ती’साठी शिक्षण विभागाचीच ‘परीक्षा’ !

पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी संभ्रमात असून, वर्षभरापासून ते नियमितपणे अभ्यास करीत आहेत

संदीप लांडगे

औरंगाबाद: राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा रद्द केल्याने दहावी आणि बारावीचे विद्यार्थी तणावमुक्त झाले. परंतु, शासनाने प्रज्ञाशोध, नवोदय प्रवेशपूर्व, शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्‍चित कालासाठी स्थगित केल्या आहेत. या परीक्षा कधी होतील, होणार की नाही, याबाबत शासनाच्या अद्याप कुठल्याही स्पष्ट सूचना नाहीत. त्यामुळे या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी संभ्रमात असून, वर्षभरापासून ते नियमितपणे अभ्यास करीत आहेत.

शिक्षण विभागाकडून दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात शाळेच्या वार्षिक परीक्षा संपल्या की दोन महिने विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. मात्र, गतवर्षीपासून शैक्षणिक वर्षाचे नियोजन पूर्णपणे बिघडले. सध्या शिष्यवृत्तीसोबतच प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध, नवोदय प्रवेशपूर्व आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा प्रलंबित आहे.

आतापर्यंत दोन वेळा या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या. त्यानंतर कोरोनामुळे या परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्या. आता या परीक्षा होणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. असे असले तरी पालक मात्र नियमितपणे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करण्यासाठी अभ्यासाला बसवताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुटीचा आनंद मात्र हिरावून घेतला आहे.

वर्षभरात काय झाले?

मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने लॉकडाउन लावले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारीत काही काळासाठी शाळा सुरू झाल्या. पाचवीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिलला घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढल्याने २३ मे ही दुसरी तारीख जाहीर केली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ती तारीखही रद्द केली. पुढील तारीख यथावकाश कळविली जाईल, असे नव्या आदेशात म्हटले. आता १४ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. पण, या परीक्षा होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT