Astronomical Conference sakal
महाराष्ट्र बातम्या

Astronomical Conference : राज्यातील पहिलं खगोल संमेलन पडले पार

राज्यभरातील खगोल अभ्यासक, प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र खगोल संमेलन नुकतेच पुण्यात पार पडले.

सकाळ वृत्तसेवा

राज्यभरातील खगोल अभ्यासक, प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र खगोल संमेलन नुकतेच पुण्यात पार पडले.

पुणे - राज्यभरातील खगोल अभ्यासक, प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र खगोल संमेलन नुकतेच पुण्यात पार पडले. दीडशे हून अधिक सहाभागीतांनी खगोलशास्त्रज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, आकाश दर्शन आणि रेडिओ वेधशाळेला भेट अशा वैज्ञानिक उपक्रमांचात सहभाग घेतला.

फर्ग्युसन महाविद्यालय आणि खोडद, नारायणगाव येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) येथे २६ ते २८ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या 'महाराष्ट्र खगोल संमेलनाचे' आयोजन सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए), फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) आणि विज्ञान भारती या संस्थानी केले होते.

पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. योगेश शौचे, खगोलशास्त्रीय महाप्रकल्पांवर समीर धुर्डे, जेम्स वेब अवकाश दुर्बिणीवर प्रा. योगेश वाडदेकर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडिओ वेधशाळांवर प्रा. यशवंत गुप्ता, नवव्या ग्रहाचा शोधावरप्रा. सुहृद मोरे आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. अजित केंभावी यांनी खगोल संशोधनात नागरिक कसे सहभागी होऊ शकतात हे प्रात्यक्षिकासह दाखवले. राज्यभरातून आलेल्या १३ विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी संमेलनात आपल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. न्यू इंग्लिश स्कुलच्या तारांगणाच्या भेटीलाही राज्यभरातील आकाशप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

खोडद येथील जीएमआरटीला भेट देऊन रेडिओ वेधशाळेचे कार्य कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव राज्यभरातून आलेल्या आकाशप्रेमींना खगोल संमेलनात घेता आला. जीएमआरटी येथे झालेल्या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना खगोल छायाचित्रणाचे प्रशिक्षण देण्यात आले. सध्या उत्तरेच्या आकाशात असलेला ‘सी/२०२२ ई३’ (झेडटीएफ) हा धूमकेतू आकर्षणाचे केंद्र ठरला.

'सिटीझन सायन्सचा प्रसार व्हावा'

'वैज्ञानिक अभ्यासासह सामाजिक प्रश्नांवर सिटीझन सायन्सद्वारे उत्तर शोधणे शक्य आहे. नागरिकांच्या सहभागातून शास्त्रीय संशोधनाचा प्रयोग राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राबवला जावा,' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे यांनी महाराष्ट्र खगोल संमेलनाच्या उदघाटनात व्यक्त केले.

या प्रसंगी एनसीआरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता, सीसीएसचे अध्यक्ष प्रा. योगेश शौचे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी उपस्थित होते. संमेलनाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन राज्यभरातून आलेल्या खगोलप्रेमींचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT