Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Fourth Women Policy : महाराष्ट्रात चौथं महिला धोरण येणार; अजित पवारांची घोषणा

महिलांच्या प्रश्नांबाबत या धोरणात असणार विशेष तरतुदी

Amit Ujagare (अमित उजागरे)

Maharashtra Fourth Womens Policy : बदलत्या काळात महिलांचे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार नवं महिला धोरण आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली. याबाबत आज महत्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली, यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पत्रकारांनी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. (Maharashtra Fourth Women Policy will come DCM Ajit Pawar announcement)

अजित पवार म्हणाले, "राज्यात पहिलं महिला धोरण सन १९९४ साली आलं. त्यानतंर दुसरं धोरणं सन २००१ला आलं. तिसरं धोरण २०१४ ला तर आता चौथं धोरण २०२३ला आम्ही आणतोय. या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांना आजच्या बैठकीत या धोरणासंदर्भात सर्व महिलांशी चर्चा करण्यास सुचवलं होतं. यांमध्ये वेगवेगळ्या महिला संघटनांशी, सहकारी महिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला होता. जवळपास १ लाख जणांनी इथं आपलं मत मांडलं" (Latest Marathi News)

मविआ सरकारवेळीच येणार होतं धोरण

हे धोरण मागंच आम्हाला आणायचं होतं पण काही कारणांमुळं आम्हाला विलंब झाला. त्यावेळी यशोमती ठाकूर महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. नंतर मंगलप्रसाद लोढा त्या खात्याचे मंत्री झाले आणि आता आदित्य तटकरे झाल्या आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

आदिती तटकरेंवर जबाबदारी

आदिती तटकरे यांना महिलांच्या प्रश्नांची जाण असल्यानं चौथं महिला धोरण अतिशय विचारपूर्वक या पुरोगामी राज्यात आणण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. याचं प्रेझेंटेशन मुख्यमंत्री आणि मला त्या विभागानं दिलं. या विभागाचे सचिव आणि आयुक्त देखील तिथं हजर होते, त्यांची एक कमिटी पण तिथं हजर होती, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT