मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १ हजार २७८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत ४ हजार १९९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत तर २२ हजार १७१ जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात ५३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या ८३२ झाली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५,जळगाव शहरात ५,धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, नगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदुरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये एकाचा झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एकाचा आज मुंबई येथे मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.