chhagn bhujbal 1.jpg sakal
महाराष्ट्र बातम्या

इम्पिरिकल डेटासाठी याचिका - छगन भुजबळ

केंद्र सरकारकडे (central government) असलेली ओबीसींची सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारी याचिका आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली,

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे (central government) असलेली ओबीसींची सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारी याचिका आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आज दिली.(maharashtra goverment Petition on Imperial Data)

भुजबळ म्हणाले, की ओबीसींचा इम्पिरिकल डेटा उपलब्ध नसल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गदा आली आहे. केंद्राच्या केंद्रीय ग्रामीण विकास व नागरी विकास विभागांनी ओबीसींचा इम्पिरिकल डेटा जमा केला. हे काम २०११ ते १४ पर्यंत चालले. दरम्यान, ११ मे २०१० ला तत्कालीन मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन्‌ यांच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला. या निकालामध्ये घटनेची २४३ डी (६) व २४३ टी (६) ही कलमे वैध ठरवली. म्हणजेच इतर मागास प्रवर्गाचे ग्रामीण व नागरी पंचायतराज संस्थामधील आरक्षण वैध ठरवले. मात्र हे देताना त्रिसूत्रीची अट घातली.

त्याचा उल्लेख याचिका क्रमांक ९८०/२०१९ चा ४ मार्च २०२१ ला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने केला. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व तत्कालीन ग्रामविकास प्रधान सचिवांनी २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र केंद्र सरकारचे जनगणना आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय मंत्रालय व ग्रामविकास मंत्रालय यांनी टोलवाटोलवी केली. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आलिशान गाड्या, तब्बल २७१ कोटींची संपत्ती अन्...; महापालिका निवडणुकीत पुण्यातील 'या' आमदारांचे पुत्र सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले

Ruturaj Gaikwad: 'उठ, तयार हो आणि दाखवून दे...', आर अश्विनची भारतीय संघातून वगळलेल्या ऋतुराजसाठी खास पोस्ट

Accident News: मुरदोलीजवळ सीएनजी सिलिंडर भरलेला ट्रेलर उलटला; वाहतूक ठप्प, सिलेंडर लिक झाला अन् नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या प्रचाराचा वरळीतून शुभारंभ

Mokhada News: मोखाड्यात शिक्षण विभागाने घालून दिला माणुसकीचा आदर्श; अपघातग्रस्त विद्यार्थ्यांला दिला मदतीचा हात!

SCROLL FOR NEXT