Maharashtra Government Weather Satellite eSakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Satellite : नैसर्गिक आपत्तींची आधीच मिळणार माहिती, शिंदे सरकार लाँच करणार स्वतःचा हवामान उपग्रह; काय आहे योजना?

हा उपग्रह तयार करायला वेळ लागेल. शिवाय केंद्राकडूनही काही परवानग्या घ्याव्या लागतील.

सकाळ डिजिटल टीम

हवामान खात्याचा अतिवृष्टी संदर्भात अंदाज अनेकदा चुकत आहेत. त्यामुळे नुकसान टाळता येण्यास मर्यादा येत असल्याची टीका होत आहे. यावर उपाय म्हणून आता राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून एक सॅटेलाईट तयार करण्यात येणार आहे. यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अतिवृष्टी, पूर, भूकंप आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीची माहिती आधीच मिळाली तर उपाययोजना करून नुकसान टाळता येते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागाचा स्वत:चा ‘सॅटेलाईट’ तयार करण्यात येणार आहे. भूगर्भातील घडामोडी, हवामानाचा अचूक अंदाज, पाऊस आदींबाबत किमान २४ तासापूर्वी तसेच जास्तीत जास्त एक आठवड्यापूर्वी याद्वारे माहिती उपलब्ध होऊ शकते, असं पाटील यांनी सांगितलं.

केंद्राची परवानगी आवश्यक

या कामासाठी एका शास्त्रज्ञाची नियुक्ती केली जाईल. तसेच कृषीसह विविध विभागांना या उपग्रहाचा फायदा होऊ शकतो, अशा सर्व विभागांनाही यात सहभागी केले जाईल. हा उपग्रह तयार करायला वेळ लागेल. शिवाय केंद्राकडूनही काही परवानग्या घ्याव्या लागतील, त्यानंतरच याबाबत काम सुरू होईल, असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं.

अग्निशमन बाईक

अग्निशमनाची वाहने मोठी असल्याने अरुंद गल्लीत जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणी घटना घडली तर त्यांना तातडीने मदत देणे कठीण होते. त्यामुळे अशा अरुंद गल्लीत जाण्यासाठी अग्निशमन बाईक तयार करण्याची योजनाही मदत व पुनर्वसन विभाग तयार करीत आहे. या बाईकच्या माध्यमातून आगीच्या ठिकाणी फवारणी करून ते परत येतील. त्यामुळे घटनांची तिव्रता कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

गावात प्रथमोपचार किट

एखादी दुर्घटना घटना घडल्यास सर्वात प्रथम नजिकच्या गावाताली नागरिक घावून येतात. यातही काही युवक समोर असतात. गावातील काही जणांना आवश्यक प्रशिक्षण देऊन तिथे प्रथमोपचारसह इतर आवश्यक किट देण्याचा प्रयत्नही विभागाचा असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT