Maharashtra Government forgot to pay tributes to 26 11 Mumbai terror attack martyrs
Maharashtra Government forgot to pay tributes to 26 11 Mumbai terror attack martyrs  
महाराष्ट्र

मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांचा सरकारला विसर!

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर या हल्ल्यातील हुतात्म्यांना आणि मृतांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले. 

सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारकडून मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तसा ठराव न मांडल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाच्या अध्यक्षांकडे तशी मागणी केली.

विखे पाटील म्हणाले की, या हल्ल्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचे अनेक अधिकारी व जवान हुतात्मा झाले. अनेक निरपराध नागरिकांचाही बळी गेला. त्यामुळे विधानसभा सुरू असताना आदरांजली अर्पण करून त्यांचे स्मरण केले गेले पाहिजे.''

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही विखे पाटील यांच्या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाची भावना लक्षात घेता मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT