Nawab Malik sakal media
महाराष्ट्र बातम्या

डेल्टा+च्या २१ रुग्णांपैकी किती जणांचं लसीकरण?

नरेश शेंडे

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत असले तरी नव्यानं उदयास आलेल्या डेल्टाप्लस व्हेरियंटमुळे (Delta Plus Variant) संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका (Third corona wave) निर्माण झाला आहे. रत्नागिरीच्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचं डेल्टाप्लस व्हायरसमुळं मृत्यू झाल्याची पहीली नोंद करण्यात आलीय. त्यानंतर डेल्टाप्लसचा नायनाट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून लसीकरण करण्याकडे भर देत आहेत. मात्र, अपुऱ्या लशींअभावी महाराष्ट्रात लसीकरण संथ गतीनं (Corona Vaccination ) सुरु आहे. यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत, डेल्टाप्लसचा संसर्ग झालेल्या २१ रुग्णांपैकी फक्त एकानेच कोविड १९ लशीची पहिली मात्रा घेतली होती.असे वृत्त मिड डे मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ( Maharashtra Government gives answer total number of delta plus patients vaccination)

राज्यात पुरेसा लशींचा साठा असल्यास दोन महिन्यांतच लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांना लशींचे डोस देणे शक्य होईल. लसीकरणामुळं कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी होत आहे. राज्यातील ७ जिल्ह्यामंध्ये हा कोरोनाच्या नवा डेल्टाप्लस व्हेरियंटचा संसर्ग झाला असून हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं निदर्शनात आलंय. या व्हायरसचा संसर्ग २१ जणांना झाला आहे. महाराष्ट्राला पुरेसा लशींचा साठा उपलब्ध झाल्यास दोन महिन्यांतच राज्यातील सर्वाचे लसीकरणं करणं शक्य होईल. डेल्टाप्लसचा संसर्ग झालेल्या २१ जणांपैकी फक्त एका रुग्णाने लशीची पहिली मात्रा घेतली होती .अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. डेल्टाप्लस व्हायरसमुळं रत्नागिरीतील मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची पहिली नोंद झाली.

देशात बारा राज्यांत डेल्टाप्लसचे रुग्ण सापडले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक २१ रुग्ण सापडले असून केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे निर्बंध कायम असून लॅाकडाऊन वाढविण्यात आला आहे. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणावा, असे आवाहनही राज्य सरकारने जनतेला केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT