rajesh.jpg 
महाराष्ट्र बातम्या

रात्रीची कडक संचारबंदी लागू करणार, राजेश टोपेंचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यात ज्या ठिकाणी कोरोना प्रसार वाढीचा दर जास्त आहे. अशा ठिकाणी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन रात्रीची कडक संचार बंदी लागू केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करतील,’’ असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात तेथे टास्क फोर्सची बैठक बोलावण्यात आली होती त्यानंतर टोपे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’’ राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितले होते. तसेच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते.

देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर असून, करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली होती. केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेने अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले होते.

केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५ करोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. तेथे ओणम या उत्सवासाठी लोक एकत्र आले होते. तर महाराष्ट्रात लवकरच गणपती उत्सव येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकार निर्बंध कडक करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT