Maharashtra Stopped Genome Sequencing sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारनं थांबवलं जीनोम सिक्वेन्सिंग; सर्वाधिक रुग्ण ओमिक्रॉनचेच?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या (Maharashtra Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Maharashtra Omicron Cases) संख्या देखील अधिक आहे. शेवटच्या जीनोम सिक्वेन्सिंगमधील (Genome Sequencing) तब्बल ५५ टक्के नमुने ओमिक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जीनोम सिक्वेन्सिंग थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात सापडणारे सर्वाधिक रुग्ण हे ओमिक्रॉनचेच आहेत का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. सध्या देशात ओमिक्रॉनचे २६३० रुग्ण आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात ७९७ इतके आहेत. त्याखालोखाल दिल्लीत ४८५ तर राजस्थानात २३६ रुग्ण आहेत. केरळमध्ये २३४, गुजरातमध्ये २०४ आणि तामिळनाडुत १२१ ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.

मुंबई सर्वाधिक रुग्ण -

मुंबईत गेल्या २४ तासांत १५१६६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच तिघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी नव्या १४४ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले असून मुंबईत शाळा-महाविद्यालय बंद करण्यात आली आहे. तसेच मुंबईत काही दिवसात ओमिक्रॉनची लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

देशातील स्थिती काय? -

गेल्या चोवीस तासात देशभरात 19 हजार 206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6.43 टक्क्यांवर गेला आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 82 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 2 लाख 85 हजार 401 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशातील 3 कोटी 43 लाख 41 हजार 009 रुग्ण कोरोनातून रिकव्हर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT