Anil Ambani Sakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Ambani: फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका, भाडेतत्त्वावरील 'ही' 5 विमानतळे घेणार परत

महाराष्ट्र सरकारने पाच विमानतळे 2009 मध्ये अनिल अंबानींना 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती.

राहुल शेळके

Anil Ambani: अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता विमानतळ भाडेतत्त्वावर परत घेण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की, महाराष्ट्र सरकार अनिल अंबानींच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (RADPL) कंपनीकडून पाच विमानतळे परत घेणार आहे.

महाराष्ट्र सरकारने ही पाच विमानतळे 2009 मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या RADPL ला 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली होती.

आता त्यांना परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाच विमानतळांमध्ये बारामती, नांदेड, लातूर, यवतमाळ आणि उस्मानाबादचा समावेश आहे.

कंपनी विमानतळाची देखभाल करत नाही

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, RADPL विमानतळांची देखभाल करत नाही. याशिवाय थकबाकीही भरली जात नाही. अशा परिस्थितीत नांदेड विमानतळ बंद करण्यात आले आहे.

विमानतळ ताब्यात घेण्याच्या कायदेशीर मुद्द्यावर महाधिवक्ता यांच्याशी चर्चा करू, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राज्य सरकार पाच विमानतळांची सर्व थकबाकी देखील भरणार आहे आणि फर्मकडून रक्कम देखील वसूल करणार आहे.

32 पैकी केवळ 11 विमानतळ कार्यरत आहेत

फडणवीस यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात जवळपास 32 विमानतळे आहेत, त्यापैकी केवळ 11 सक्रिय विमानतळे आहेत.

काँग्रेस नेते म्हणाले की, नांदेड विमानतळ बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. याशिवाय, मुंबई विमानतळावरही मोठ्या शहरांच्या उड्डाणांसाठी पुरेसा स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे राज्यात प्रवास करणे कठीण झाले आहे.

नोडल एजन्सी बनवण्याची घोषणा

मुंबई विमानतळावर अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. ते लवकरच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत आणि त्यांना राज्यातील प्रमुख शहरांसाठी अधिक स्लॉट देण्यास सांगण्यात येणार आहे.

याशिवाय नोडल एजन्सी स्थापन करण्याची घोषणाही फडवीस यांनी केली आहे. ही नोडल एजन्सी विमानतळाच्या विकासाचे काम पाहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT