maharashtra flood
maharashtra flood sakal media
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मान्यता

विराज भागवत

महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: गेले काही दिवस मुसळधार (Heavy Rainfall) पडणाऱ्या पावसाने अखेर विश्रांती घेतली. पण या पावसाच्या रौद्ररुपाने कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara), कोकण (Konkan) आणि रायगडसह (Raigad) इतर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत केलं. काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर कुठे नदीतील पाण्यामुळे पूरपरिस्थिती (Flood) ओढवली. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकांनी श्रमदान व आर्थिक सहाय्य पुरवत या पूरबाधितांना आधार दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय झाला. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास (Relief Package) आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

पूर, दरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे तसेच तज्ज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूराचे संकट, दरडी कोसळण्याच्या घटना यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महाड व चिपळूण शहरातील पूर नियंत्रणासाठी तज्ञ समितीच्या अहवालानुसार वशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळा काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पुर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा. कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प (काळू, शाई,काळ ई.) येणा-या ३ वर्षात पूर्ण करा. कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्या. डोंगर कोसळण्याच्या घटनेवर प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा. कोकणाच्या २६ नदी खो-यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली ३ महिन्यात स्थापित करा", अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला केल्या.

आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या पॅकेजबद्दल अधिक माहिती दिली. "कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पाणी भरून दरडी कोसळून मोठं नुकसान झालं. त्यावर सविस्तर दीर्घकालीन योजना आपण आखतो आहोत. ११ हजार ५०० रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. SDRF च्या निकषांपेक्षा अधिक सानुग्रह अनुदान आणि दुकानदारांना ५० हजार रुपये मदत आपण देणार आहोत. घर पूर्ण पडलं असल्यास १ लाख ५० हजार रुपये आणि अर्ध घर पडलं असल्यास ५० हजार आणि घराचं कमी पण काही प्रमाणात नुकसान झालं असल्यास १५ हजार रुपये मदत केली जाणार आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यातून अंदाजे ८०% माहिती आली आहे. अजून काही पंचनामे व्हायचे आहेत. ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळेच पॅकेजची आज घोषणा केली आहे. लगेच उद्यापासून मदत करायला आपण सुरुवात करणार आहोत. थेट अकाउंटमध्ये पैसे द्यायला सरकारकडून सुरुवात होणार आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीची पूर्ण मदत केली जाईल", असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT