Dhananjay Munde on Drone eSakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : शेतकऱ्यांनी हायटेक होत पीक फवारणीसाठी ड्रोन वापरावं; प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम राबविणार - धनंजय मुंडे

शेतकरी ‘हायटेक’ झाल्यास उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

सध्या पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतीकडे व्यावसायिकपणे बघण्याची गरज आहे. बदलत्या काळात शेतकऱ्यांनी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत शेतीत अत्याधुनिक यंत्रांच्या वापरावर भर द्यावा. फवारणीसाठी ‘ड्रोन’चा वापर करावा, पर्यायाने शेतकरी ‘हायटेक’ झाल्यास उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसंदर्भातील लक्षवेधीची सूचना अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली होती. यानंतर चर्चेतून अनेक उपप्रश्न पुढे आल्यानंतर मुंडे यांनी फवारणीसाठी ‘ड्रोन’ चा पर्याय पुढे आणला. अलीकडे शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव आहे. तर यंत्र युगात अत्याधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे. यासाठी केंद्र शासनाकडून ‘एसओपी’ अर्थात स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात येईल.

त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ड्रोन पायलट अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग चालविता येतील. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या मुलांनाही या ड्रोन पायलट, तसेच मेकॅनिकल अभ्यासक्रमाचा फायदा होईल. सोबतच शेतमालासाठी मार्केट लिंक तयार मिळाल्यास कृषी क्रांती शक्य आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ३६२ शेतकऱ्यांनी मधुमक्षी पालन व्यवसाय केले. ५कोटी २३लाखांचे अनुदान त्यांना मिळाले, असे मुंडे म्हणाले.

लोकशाही दिनाला कृषी अधिकारी हवेत!

जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा लोकशाही दिन पाळला जातो. त्या ठिकाणी विविध विभागाचे अधिकारी असतात. त्या दिवशी कृषी अधिकारी उपस्थित राहिल्यास अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करता येणे शक्य आहे, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. यावर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी याचा विचार करता येईल, असेही मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT