devendra fadnavis eknath shinde ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Govt: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 85 कोटींच्या देणार जाहिराती; निधीला मिळाली मंजुरी

दोन महिन्यांत केवळ जाहिरातींसाठी सरकार करणार 85 कोटींचा खर्च

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जाहिरातींसाठी ८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं याबाबतच जीआरही काढला आहे.

हा निधी वितरितही करण्यात आला असून जनतेच्या इतक्या मोठ्या पैशांचा जाहिरातींवर खर्च होणार असल्यानं विरोधक काय भूमिका घेतात हे पहावं लागणार आहे. (maharashtra govt will spend 85 crore for advertisment ahead of lok sabha elections 2024 fund was approved)

विशेष प्रसिद्धी मोहिम

शासन निर्णयानुसार, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत विशेष प्रसिद्धी मोहिम राबवण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यासाठी ८४ कोटी १० लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. ४ मार्च २०२४ रोजी सरकारनं या खर्चाला मान्यता दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

'या' माध्यमांतून जेणार जाहिराती

यामध्ये असंही म्हटलंय की, शासनामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती, उपक्रम, विकासकामं, शासकीय संदेश यांना व्यापक प्रसिद्धी देऊन त्यांचा प्रसार करण्यासाठी वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडियो, होर्डिंग्ज-एलईडी-बस-ट्रेन-वॉल पेंटिंग, सोशल मीडिया, डिजिटल मीडियांमार्फत 'विशेष प्रसिद्धी मोहिम' फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या काळात राबवण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

असा असणार मीडियाचा खर्च

यामध्ये प्रिंट मीडियासाठी २० कोटी, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी २० कोटी ८० लाख, सोशल मीडियासाठी ५ कोटी, होर्डिंग्ज-एलईडी-बस-ट्रेन-वॉल पेंटिंग आदींसाठी ३७ कोटी ५५ लाख तर सरकारी संदेशांसाठी ७५ लाख ५० हजार रुपये अशा रक्कमा वितरीत करण्यात आल्या आहेत.

विरोधकाचं खर्चाकडं लक्ष

दरम्यान, सरकारकडून दोन महिन्यात सुमारे ८५ कोटी रुपये जाहिरातींसाठी खर्च करण्यात येणार आहे. सरकारी तिजोरीतून होणाऱ्या या अवाढव्य खर्चावर नेहमीप्रमाणं विरोधक आक्षेप नोंदवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT