हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.  Sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राने अनेक संकटं झेलली पण अशी परिस्थिती कधीच नव्हती - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याची चिंताजनक परिस्थिती राष्ट्रपतींसमोर मांडली. महाराष्ट्राने अनेक संकट झेलली पण अशी परिस्थिती कधीच नव्हती.

मंत्री जाहीर सभेतून एकमेकांना आव्हान देत आहेत. एक सर्वसमावेशक भूमिका घेऊन आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सामावून घेताना घटनेत तरतूद करून घ्यावी.

हे सगळ संसद आणि केंद्र सरकारच्या हातात आहे. येत्या अधिवेशनात विशेष प्रस्ताव आणून तो या सोडवावा, अशी मागणी ठाकरे गटाने राष्ट्रपतींकडे केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आश्वासन दिलं आहे की या विषयात लक्ष घालून तोडगा काढण्याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यात शांतता राहावी, तो दुभंगला जाऊ नये ही आमची भूमिका आहे.

आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर ती संसदेत आणावी लागते. मग हे राज्यात काय करणार आहेत? ते टिकत नाही हे अताच्या हरियाणावरून दिसून आलं आहे. येत्या अधिवेशनात सर्वसमावेशक आरक्षण द्यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रात आणायचं काम राज्य सरकारने करावं. राज्य सरकार घटनाबाह्य असलं तरी त्यांनी घटना दुरुस्ती करावी. पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांना विषय माहीत नाही का? ते राज्यात आले तेंव्हा जारांगे उपोषणाला बसले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT