Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Sachin Tendulkar Reaction on Student Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एक भावनिक आणि विचार करायला लावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...
Updated on

Sachin Tendulkar reaction on student protest at Jantar Mantar Delhi, CJP : जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भाष्य केले आहे. त्याने त्याच्या संपूर्ण पोस्टमध्ये जंतरमंतर, NEET परिक्षा याचा कोणताही उल्लेख केला नसला तरी त्याची ही पोस्ट विद्यार्थ्यांसाठी असल्याचे स्पष्ट आहे. NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी कॉकरोज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ते ठाम आहेत. पण, या आंदोलनाला आता हिंसक वळण आल्याचे दिसतेय आणि दिल्ली पोलिसांनी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याने आणखी वाद वाढला आहे. त्यात आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने समाजाला विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com