corona update
corona update 
महाराष्ट्र

Corona Update: नव्या वर्षी काळजी घ्या! राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्ण संख्येत वाढ; पुण्यात सर्वाधिक

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 चे १९ रुग्ण आढळून आले आहेत. JN.1 व्हेरियंटची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात शनिवारपर्यंत JN.1 व्हेरियंटचे १० रुग्ण होते, त्यात आता १९ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नवा व्हेरियंट राज्यात पाय पसरत असल्याचं चित्र आहे. (Maharashtra has reported 19 new cases of the JN1 variant of coronavirus The highest number of cases reported in Pune)

ठाणे, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. JN.1 व्हेरियंट हा BA.2.86 चा वंशज आहे. याला पिरोला म्हणून ओळखलं जायचं. JN.1 च्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली होती. एका ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. त्यानंतर तो देशभरात पसरु लागला आहे.

रविवारी देशातमध्ये कोरोनाचे ८४१ रुग्ण आढळून आले आहेत. सात महिन्यातील ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने राज्य सरकारांना मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा JN.1 व्हेरियंट घातक नसला तरी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांना मुखपट्टी लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नव्या वर्षानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर जनतेने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT