rajesh tope 
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळातून लॉकडाऊनला विरोध, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल - राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले असले तरी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मात्र यामध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील नेत्यांकडून लॉकडाऊनला विरोध केला जात आहे. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पुन्हा लॉकडाऊन नको, आम्ही विरोध करू असं म्हटलं आहे. दरम्यान, आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. मंत्रीमंडळातही काही लोकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. जरी विरोध होत असला तरी परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा लागतो. तो असा अचानक घेतला जाणार नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय होईल. लोकांनी नियम पाळला नाही तर कठोर निर्णय घ्यायला लागेल असंही त्यांनी म्हटलं. 

लसीकरण मोहिम सुरु झाली असली तरी अद्याप काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एबीपी माझाशी बोलताना राजेश टोपे यांनी नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. सध्या लॉकडाऊन कुणालाच नको आहे. सरकारने काढलेल्या निर्बंधाच्या सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होतेय. लॉकडाऊन टाळायचं असेल तर निर्बंधाचे पालन व्हायला हवे. कोणतेही निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातात असं राजेश टोपेंनी म्हटलं. 

राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला असताना, आणखी काही कडक निर्बंध लागू करायचे का याचा विचार सुरु आहे. हॉटेल, सिनेमागृहे यांसारखी गर्दीची ठिकाणे पूर्ण बंद करण्याचा विचार करावा लागेल. अर्थकारण चाललं पाहिजे आणि जीवही वाचले पाहिजेत. त्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं राजेश टोपेंनी सांगितलं. 

सध्या राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते. रुग्ण वाढीचा ताण आरोग्य यंत्रणांवर असून बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं राजेश टोपे यांनी मान्य केलं. ऑक्सिजन आणि बेड संख्या पाहून लॉकडाऊनचा निर्णय होईल. तसंच ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला असून घरी विलगीकरण शक्य नसलेल्यांनी रुग्णालयात जावं असं आवाहन राजेश टोपेंनी केलं. सर्व रुग्णालयांना बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. हाय रिस्क आणि लो रिक्स शोधून काढून 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT