Video Viral Sakal
महाराष्ट्र बातम्या

Video: पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रूपयांची वसुली; पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर एका एकरासाठी ४०० रूपये वसूल केले जात असल्याचा दावा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दोन कर्मचारी एका शेतकऱ्यांकडून एका एकराचा पंचनामा करण्यासाठई ४०० रूपये मागत आहे. तर अर्ध्या एकरासाठी २०० रूपये घेण्यात येत आहेत. एका शेतकऱ्याने जाब विचारला असता या कर्मचाऱ्यांकडून बाकीच्या शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या पैशांची यादी दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती असून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पिकांचे पंचनामे करून मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता पिकांच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. तर यावेळी शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात येत असल्याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओसंदर्भात प्रशासनाकडून अजून अधिकृत माहिती समोर आली नसून आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT