Maharashtra Rain Updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Updates : छत्री घेऊनच घराबाहेर पडा! राज्यात मुंबई-पुण्यासह 'येथे' आज मुसळधार पाऊस

रोहित कणसे

Maharashtra Rain Updates : राज्यातील काही भागात मागील काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर, उपनगर यासह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस झाल. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागात पाऊस झाला. यादरम्यान येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार अशल्याचा इशारा हमामान विभागाने दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी पावसाने झोडपून काढलं. आजही २४ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात शुक्रवारच्या पावसाने वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच मुंबई शहरात झाडे कोसळल्याच्या घटना देखील समोर आल्या.

हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात पावसाचा रेड अलर्ट जारी तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पालघर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या २४ तासांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

Viral Video : भर लग्नात मर्डरचा थरार! प्रियकराने वरमालावेळी नवरीवर झाडल्या गोळ्या; नवरदेव बघतच राहिला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

'परदेसी..' गाण्यामुळे झाली सुपरस्टार, संगीतकाराबरोबर अफेअर आणि आईचा विरोध; आता काय करते ही अभिनेत्री?

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

SCROLL FOR NEXT