anil deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी फडणवीसांना दिला खोचक सल्ला

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 7 : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील वेगवेगळ्या भागांना भेट दिली. याठिकाणी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसंच येरवडा कारागृहातील स्वॅब सेंटरची पाहणी केली. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांसाठी मोठी घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 55 वर्षे वय असणाऱ्या 12 हजार पोलिसांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात त्यांना वेतन मिळणार आहे तर 50 ते 55 वयोगटातील सुमारे 23 हजार पोलिसांना पोलिस ठाण्यातच ड्युटी लावण्यात आली आहे. तसेच पोलिसांना चांगल्या उपचारासाठी आवश्‍यकता भासल्यास एक लाख रुपये आगाऊ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली. 

पुणे शहरात वेगवेगळ्या भागांना भेटी देत कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,""कारागृहामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी राज्यातील 24 जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरुपात 31 कारागृह उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांच्या इमारती जेलमध्ये परावर्तीत करुन, तिथे त्यांची सोय केली आहे. यामुळे कैद्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होणार आहे. आजपर्यंत राज्यातील 9 हजार 671 कैद्यांना सोडण्यात आले आहे. येत्या काही दिवसात आणखी 11 हजार कैद्यांना सोडण्यात येणार आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत गंभीर गुन्हे असलेल्या कैद्यांना बाहेर सोडण्यात येणार नाही.'' 

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेलाही अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात राज्य सरकार उत्तम काम करीत आहे. या अडचणीच्या काळात अनेक सामाजिक संस्था, संघटना सरकारच्या पाठीशी उभ्या आहेत. जनता एकत्र येत आहे. मात्र, सातत्याने टीका करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारण करीत आहेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा राजकारण करण्याची ही परिस्थिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी वरिष्ठांचे अनुकरण करायला पाहिजे, असा खोचक सल्ला देशमुख यांनी फडणवीस यांना दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT