Maharashtra HSC Result 2023  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra HSC Result 2023: प्रतीक्षा संपली बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा रिझल्ट

राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली

धनश्री ओतारी

Maharashtra HSC Result 2023
राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर आज बारावीचा निकाल 2 वाजता ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. १२ वीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.१ टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे.

मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४. ६९ टक्के अधिक आहे. त्यामुळे १२ वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. गेल्यावर्षीपेक्षा १ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

यंदा ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. त्यामुळे आता लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलेले होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

ऑनलाईन निकाल कसा पाहाल?(How to check Maharashtra HSC results online)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.

होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra hsc results 2023 marksheets)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.

बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.

तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.

तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.

एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT