एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाने पटकावला प्रथम क्रमांक sakal
महाराष्ट्र बातम्या

‘आयडीएसएससी’ स्पर्धेत राज्याचा डंका

तब्बल चार वर्षानंतर एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाने पटकावला प्रथम क्रमांक

अक्षता पवार

पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने महू येथे झालेल्या ‘इंटर डायरेक्टोरेट फायरिंग स्पर्धे’मध्ये (आयडीएसएससी) ९५३७ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यात देशातील १७ एनसीसी संचालनालयातील एकूण १७० एनसीसी कॅडेट्सने सहभाग घेतला होता. तब्बल चार वर्षानंतर महाराष्ट्र संचालनालय पुन्हा राष्ट्रीय स्तरावर प्रथम आला आहे. विजेते ठरलेल्या महाराष्ट्र संचालनालयाच्या एनसीसी गटात सहा मुले व चार मुली असे एकूण दहा कॅडेट्सचा समावेश होता. त्यातील नऊ कॅडेट्स हे पुण्याचे तर एक कॅडेट मुंबई एनसीसी ‘ब’ ग्रुपचा आहे.  

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संचालनालयाच्या वतीने पुणे एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के गायकवाड यांनी कॅडेट्सची निवड आणि प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली. तसेच पुणे एनसीसी मुख्यालयातील ३६ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल सतीश शिंदे आणि कर्नल ॲलेक्स मोहन व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या एनसीसी कॅडेट्सने बालेवाडी येथे प्रशिक्षण घेतले. तर आयडीएसएससी स्पर्धा २५ ते ३० सप्टेंबरला पार पडली.

यात देशातील १७० एनसीसी कॅडेट्सने सहभाग घेतला होता. या पूर्वी २०१७ मध्ये एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाने या स्पर्धेत विजेते पद पटकावले होते. त्यानंतर २०१८ आणि २०१९ दरम्यान दुसऱ्या क्रमांकवर समाधान मानावे लागले. यंदा पश्‍चिम बंगाल एनसीसी संचालनालयाला ५२९ गुणांनी मागे टाकत महाराष्ट्र संचालनालयाने पहिले क्रमांक मिळविले आहे.

महाराष्ट्र संचालनालयाच्या दहा पैकी नऊ कॅडेट्सची निवड ‘डीजीएनसीसी’मध्ये निवड झाली आहे. तर हे निवडलेले कॅडेट्स येत्या ११ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे ‘ऑल इंडिया जी व्ही मावळणकर शूटिंग चॅम्पयनशिप’मध्ये (एआयजीव्हीएमएससी) डीजीएनसीसी संघाचे प्रतिनिधित्व करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT