Maharashtra Interim Budget 2024 ajit pawar announcement Annapurna Yojana women will get three cylinders free every year 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Interim Budget 2024: शिंदे सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट; गॅस सिलिंडर मोफत मिळणार; काय आहे नियम ?

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट मिळालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज अर्थमंत्री अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना अधिक स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट मिळालं आहे.

प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

तसेच राज्यसरकारने यंदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT