Maharashtra Interim Budget 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Interim Budget 2024: शिंदे सरकारने वैद्यकीय खर्चाचा भार हलका केला, आरोग्य विमा,मोफत तपासण्या आणि बरंच काही!

Health cover to increase under the Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana from Rs 1.5 lakhs to Rs 5 lakhs: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Interim Budget 2024:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.

अजित पवार यांनी  वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्याच्या अनेक सवलतीही देण्यात आल्या आहेत. मोफत तपासण्या आणि उपचारही मोफत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागासाठी काय सवलती देण्यात आल्या आहेत ते पाहुयात.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना ज्योतिराव लागू करण्यात आली आहे. आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब 1 लाख, जन आरोग्य 50 हजार रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

आतापर्यंत एक हजार योजना रुग्णांलयात उपचारांची सोय होती. त्यात 900 रुग्णालयांची भर पडणार असून योजनेअंतर्गत यापुढे एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध झाले आहेत.

तपासण्या आणि उपचार मोफत

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये तपासण्या, चाचण्या आरोग्य आणि उपचार मोफत करण्यात येतात. या निर्णयामुळे बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, सेवा लहान शस्त्रक्रिया, एक्स-रे चाचणी आणि प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये भरीव वाढ झाली आहे.

आपला दवाखाना 

शहरी भागातील गरजू जनतेसाठी विनामूल्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या व उपचारांची सुविधा असलेले 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ३४७ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

Pune Municipal Election : धोकादायक २१ जागांनी वाढविली चिंता; २०१७ मध्ये एक हजारापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या जागांवर लक्ष

Kidney Transplant : आईच्या मूत्रपिंडदानातून तरुणाला नवे आयुष्य

SCROLL FOR NEXT