Ram Mandir Ayodhya 
महाराष्ट्र बातम्या

Ram Mandir: राम मंदिरासाठी ४० गुंठे जमीन दान ! जळगाव जिल्ह्यातील वडलीत लोकसहभागातून संकल्प पूर्णत्वास

वडली (जि.जळगाव) येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून राम मंदिर उभारले आहे. प्रल्हाद अर्जुन पाटील यांनी मुख्य रस्त्यानजीक असलेल्या शेतातील ४० गुंठे जमीन मंदिरासाठी दान केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jalgaon News: वडली (जि.जळगाव) येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून राम मंदिर उभारले आहे. प्रल्हाद अर्जुन पाटील यांनी मुख्य रस्त्यानजीक असलेल्या शेतातील ४० गुंठे जमीन मंदिरासाठी दान केली आहे. मंदिरात गुरुवारपासून (ता.१६) तीन दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी तेरा समित्या स्थापन केल्या आहेत.

वडली गावात राम मंदिर व्हावे, यासाठी अनेक वर्षापासून गावकऱ्यांकडून संकल्प व प्रयत्न केले जात होते;मात्र प्रत्येक वेळी काही तरी अडचण येऊन ते पुढे जात होते. सहा महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून मंदिर उभारण्याचा निर्धार केला. त्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे ट्रस्टची नोंदणी केली आहे. मंदिरासाठी प्रल्हाद पाटील यांनी शेतातील ४० गुंठे जमीन दान केली.

गावातील अनेक तरुण सरकारी, खासगी नोकरी व उद्योग, व्यवसायात आहेत. त्यांनी आर्थिक सहकार्यासह पुढाकारही घेतला अन् सहा महिन्यांत मंदिर पूर्णत्वास आले. आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी २५ लाख रुपये खर्च आला आहे. गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ही रक्कम ट्रस्टकडे जमा केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT