महाराष्ट्र बातम्या

Karjat Crime:'त्या' सहा जणांवर गुन्हा दाखल ! ५ लाख रुपयांसाठी झालेल्या छळाला कंटाळून विवाहतेने उचललं होतं टोकाचं पाऊल

विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karjat Crime News: विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सर्वजण पसार झालेले आहेत. सोनाली दीपक पांडुळे (वय ३५, रा. बर्गेवाडी) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करीत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, अशी भूमिका विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतली. मात्र, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर व आरोपींना त्वरित अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बर्गेवाडी येथे विवाहितेवर अंत्यसंस्कार केले.

याबाबत गौरव झिंजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण सोनाली दीपक पांडुळे (वय ३५, रा. बर्गेवाडी, कर्जत) हिचा वीस वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. घराचे बांधकामासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. १९ तारखेला तिने गळफास घेतल्याचे समजले.

त्यांनी तिचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाहिले असता तिच्या गळ्याला दोर बांधलेला होता, तसेच त्याचा व्रण उमटलेला होता. यावरून फिर्यादीने माझी बहीण सोनाली दीपक पांडुळे हिस घर बांधण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने, तसेच ती दुसऱ्याच्या येथे मजुरीचे कामास जात नाही या कारणावरून छळ करून दोरीच्या साहायाने गळफास देऊन तिचा खून केला आहे. (Latest Marathi News)

या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी नंदाबाई अंबादास पांडुळे, अंबादास बलभीम पांडुळे, दीपक अंबादास पांडुळे, दादा अंबादास पांडुळे, शोभा दादा पांडुळे आणि रेखा तुकाराम देमुंडे (रा. बर्गेवाडी, ता. कर्जत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT