Karnataka Border Dispute esakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Border Dispute : 'मविआ' नेते बेळगाव सीमेवर दाखल; आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा

संतोष कानडे

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटलेला असून आज महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या हे नेते बेळगावच्या सीमेवर दाखल झाले आहेत.

बेळगावच्या सीमेवर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना अडवलं असून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला असून आंदोलन आक्रमक झालेले आहेत.

हेही वाचाः ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

दरम्यान, पोलिसी बळाचा वापर करीत पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला मेळावा बंद पाडला आहे. तसेच मेळावास्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. आतापर्यंत मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक नेताजी जाधव, आर आय पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

मेळावा घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी रितसर अर्ज करून देखील पोलिसांनी सोमवारी सकाळी मेळावा होणाऱ्या व्हॅक्सीन डेपो मैदान परिसरात 144 कलम लागू करीत या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून अटक केलेल्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले आहे याबाबतची माहिती देखील पोलिसांकडून दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT