Karnataka Border Dispute esakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Border Dispute : 'ही तर गळचेपी'; बेळगावातील मेळाव्याला ऐनवेळी परवानगी नाकारली

संतोष कानडे

बेळगावः आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केलाय.

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. यावर्षीही हा मेळावा आज होणार होता. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिल्याचं एकीकरण समितीने सांगितलं. मात्र या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

बेळगावमध्ये १४४ कलम लागू करण्यात आलेलं आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. या मेळाव्याला परवानगीच दिली नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने ही गळचेपी करण्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते आज कर्नाटकात जाणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची जागोजागी तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT