uddhav thackeray on eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra-Karnataka Issue: "आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, वातीही काढल्यात फक्त..."; ठाकरेंचा सरकारला इशारा

उद्धव ठाकरेंनीही सभागृहात हजेरी लावली आणि दोन महत्वाचे डॉक्युमेंट सादर केले.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाभाग हा तातडीनं केंद्रशासित करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, वातीही काढलेल्या आहेत फक्त ते पेटवायचं बाकी आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशाराही दिला आहे. (Maharashtra Karnataka Border isuue Uddhav Thackeray demanded Controversial area should be union territory)

उद्धव ठाकरे म्हणाले, "बॉम्ब बरेच आहेत वाती काढलेल्या फक्त पेटवायच्या अवकाश आहेत. पण तोपर्यंत तातडीनं कर्नाटकनं केलेला ठराव जो लोखा मराठी माणसांचं आयुष्य बरबाद करणारा आहे. पिढ्यानं पिढ्या त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्यात, आंदोलनं केलेली आहेत.

त्यामुळं जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाहीत तोपर्यंत हा विवादित भाग केंद्र शासित व्हायला हवा अशी आमची आग्रही मागणी आहे. एखादा विषय सुप्रीम कोर्टात असताना सहाजिकच दोन्ही राज्यांनी संयमानं वागणं गरजेचं आहे. पण कर्नाटक तसं वागताना दिसत नाही. सुप्रीम कोर्टात हा विषय असतानाही त्यांनी बेळगावचं नामांतर केलं"

मी सभागृहात माझं मत मांडलं तसेच इथं एक पेनड्राईव्ह दिला त्यात सीमाभागातील मराठी शाळा, मराठीतला कारभार हे दाखवलं आहे. तसेच महाजन अहवालाची चिरफाड करणारं पुस्तकही मी सभागृहात दिलं आहे. माझं मत ठाम आहे की, जोपर्यंत हा विषय सुप्रीम कोर्टात आहे तोपर्यंत हा वादग्रस्त विषय केंद्रशासित असला पाहिजे. कर्नाटक ज्या पद्धतीनं भाषिक अत्याचार करत आहे तो थांबवला जाईल.

हे ही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT