Ajit Pawar criticize bjp govt shinde fadanvis bhagatsingh koshyari politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra-Karnataka Issue :...तर मास्टरमाईंड शोधून काढा; अजित पवारांचे थेट केंद्र सरकारला आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - Maharashtra-Karnataka Issue : दिल्ली येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सीमाप्रश्न चिघळण्यासाठी फेक ट्विट जबाबदार असल्याचे अमित शहा यांनी सांगितलं. यावर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra-Karnataka Issue news in Marathi)

अजित पवार म्हणाले की, अमित शहा यांनी बैठक आयोजित केले, त्यावेळी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी एक विधान केलं होतं. मी बैठकीला जायच की, नाही हा माझा अधिकार आहे, असं ते म्हणाले होते. मात्र बुधवारी त्यांनी समंजस भूमिका घेतली. आता दिल्लीत जे ठरलं ती भूमिका दोन्ही राज्यांनी घ्यायला हवी, असंही अजित पवार म्हणाले.

सीमावादाच्या पाठिमागे सुत्रधार कोण याची चर्चा झाली. याच्यात जाणीवपूर्वक ट्विटवर बातम्या सोडल्या आणि त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. त्यातूनच वाद झाला. मात्र काहींना वाटतं हे विरोधकांनी केलं. मात्र आम्ही सरकारमध्ये आणि विरोधी पक्षात काम केलं. राज्याच्या आणि देशाच्या एकसंधतेला धक्का लागेल, असं आमच्याकडून घडणार नाही. मात्र केंद्र सरकार आणि राज्यसरकारला तसं वाटत असेल तर चौकशी करून 'दुध का दुध, पाणी का पाणी' व्हायला हवं. तसेच मास्टरमाईंड समोर यायला हवा, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान बोम्मई यांनी सीमावादासंदर्भात वक्तव्य केलं नसतं तर ऐवढं झालं नसतं. मागील अनेक वर्षांपासून निपाणी, कारवा, बेळगावबाबत प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. यावर बोम्मई यांनी विधान केलं. शिवाय जत तालुक्याबाबतही ते बोलले. त्यामुळेच सीमावादाचा प्रश्न निर्माण झाल्याचंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT