Anil-Deshmukh
Anil-Deshmukh 
महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात पुणे आघाडीवर - अनिल देशमुख

सकाळवृत्तसेवा

पुणे - सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात पुणे आघाडीवर आहे. नेहमीच्या गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. विशेषतः बॅंका, जेएनपीटी यासारख्या कंपन्यांची संगणकप्रणाली हॅक करून पैसे उकळण्याचे काम केले जाते. अशा प्रकरणांची राज्य सायबर गुन्हे शाखेकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे, तसेच बॅंकांनीही योग्य काळजी घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सांगितले.

अनिल देशमुख यांनी रविवारी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे देत उपस्थितांशी दिलखुलासपणे संवाद साधला. देशमुख म्हणाले की, मुंबईपेक्षा पुण्यात सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद आहे. सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोर आव्हान आहे. मात्र, त्यासाठी दोन स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

पोलिस दल अद्ययावत तंत्रज्ञानांनी युक्त पाहिजे. विशेषतः ड्रोनच्या माध्यमातून काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. त्यामुळे आम्हीही ड्रोनच्या खरेदीसाठी ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबरोबरच पोलिसांचे निवासस्थान, त्यांना पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT