sakal breaking notifiction esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. माहितीनुसार, २७ वर्णीय तरुणाने नैराश्यातून हे पाऊल उचललं आहे.

अयोध्येतील दिपोत्सवाची 'गिनिज बुक'मध्ये नोंद

अयोध्येमध्ये दिवाळी निमित्त दिपोत्सव सादरा करण्यात आला. यावेळी तब्बल २२.२३ लाख दिवे लावण्यात आले होते. गिनिज बुक ऑफ रिकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलीये.

कोयना एक्स्प्रेसच्या इंडिनमध्ये बिघाड, दोन तासांपासून जागेवर थांबून

कोयना एक्स्प्रेस गेल्या दोन तासांपासून जागेवर थांबून आहे. इंडिनमध्ये बिघाड असल्याने रेल्वे साताऱ्यात थांबून आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंब्य्रात शिंदे गटाकडून आतषबाजी

उद्धव ठाकरे हे शाखेला भेट देण्यासाठी मुंब्य्रात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा झाले होते. गर्दी असल्याने पोलिसांनी शाखेच्या जवळ जाण्यास मज्जाव केला होता. उद्धव ठाकरे निघून गेल्यानंतर शिंदे गटाकडून आतषबाजी करण्यात आली.

मधमाशांच्या पोळाला तुम्ही दगड मारलाय, आता पाहा...; उद्धव ठाकरेंचा इशारा

मधमाशांच्या पोळाला तुम्ही दगड मारलाय, आता पाहा या मधमाशा तुम्हाला कुठे कुठे चावतील. निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो. नेभळटांना थारा देऊ नका. त्यांचे डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरेंचा पोलिसांशी संवाद, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

उद्धव ठाकरे मुंब्य्रात आले आहेत. यावेळी मोठा प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असून त्यांनी ठाकरेंना शाखेपर्यंत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. शाखेस्थळी जाण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.

उद्धव ठाकरे मुंब्य्रात दाखल, मविआची साथ

उद्धव ठाकरे मुंब्य्रात दाखल झाले आहेत. त्यांचा ताफा शाखास्थळी आला आहे. शाखेजवळ ठाकरेंचे भाषण होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते देखील उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत.

रेतीबंदर परिसरात ठाकरेंचे जेसीबीतून पुष्पवर्षाव करुन स्वागत

कल्याणवरुन निघालेले ठाकरे समर्थक पोलिसांच्या ताब्यात

कल्याणवरुन उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंब्य्रातील कार्यालयाची तोडफोड झाली होती. त्याची पाहणी करण्यासाठी ठाकरे मुब्य्रात पोहोचले आहेत. त्यांना लांबूनच कार्यालयाची पाहणी करता येईल, असं सांगितलं जातंय.

कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता

कोकण, पुणे-साताऱ्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे मुंब्य्राकडे रवाना

उद्धव ठाकरे मुंब्य्राकडे रवाना झाले आहेत. पाडलेल्या शाखेला ठाकरे भेट देणार आहेत. याठिकाणी ठाकरेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा याठिकाणी मोठा बंदोबस्त करण्यात आलाय.

पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

पुलवामातील पारिगम येथे पोलिस आणि सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ऑपरेशन राबवले आहे. माहितीनुसार याठिकाणी एॅनकाऊन्टर सुरु आहे. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास काश्मीर पोलिसांनी नकार दिला.

मुंब्रा दौऱ्यापूर्वी ठाणे पोलिस आयुक्तांचा ठाकरेंना फोन

ठाणे पोलीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांशी फोन द्वारे संपर्क साधला. यावेळी पोलिसांकडून आपण शांततेत आपला पाहणी दौरा करा.. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे अवाहन उद्धव ठाकरे यांना खरण्या आले

पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी देखील फोनवरूव संवाद साधला. उद्धव ठाकरे हे आज मुंब्रा शहराच्या दौऱ्यावर आहेत. येथील सेनेची शाखा जेसीबीने पाडल्यानंतर ठाकरे पाहणी दौऱ्याला येत असल्याने प्रशासन अलर्टवर आहे.

पुण्याच्या वाघोलीत सोसायटीमधील १२व्या मजल्यावर भीषण आग

पुण्याच्या वाघोलीतील कोणार्क ऑर्चिड सोसायटीमधील १२व्या मजल्यावरील एका फ्लॅट ला भीषण आग लागली असून यामध्ये फ्लॅट मधील पूर्णपणे साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळतात दोन अग्निशामक दलाच्या गाड्या व लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी करताना प्रदूषण टाळा, पर्यावरणपूरक दिपावली साजरी करण्याचे राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

ऐन दिवाळीत काळमवाडी ते कोल्हापूर थेट पाईपलाईन द्वारे पाणी; कोल्हापूरकरांचा पेढे वाटत जल्लोष

काळमवाडी ते कोल्हापूर थेट पाईपलाईन द्वारे ऐन दिवाळीत पाणी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्यावतीने कोल्हापुरातील शिवाजी चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद उत्सव साजरा केला. तसेच कोल्हापूरकरांना साखर पेढे वाटत राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसोबत केला डान्स

ड्रग माफिया ललित पाटीलला पोटदुखी अन् हर्नियाचा त्रास; उपचार सुरू

पुणे ड्रग माफिया ललित पाटील याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार दिवसापासून ललित पाटील याला हा त्रास होत आहे.

ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता त्याच्यावर उपचार करून पुन्हा त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात येत आहे. माफिया ललित पाटील याच्यावर डॉक्टर कडून उपचार सुरू आहेत

पुणे-नगर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी! दिवाळीच्या सुट्टीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका

पुणे - पुणे-नगर रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळीनिमित्त पुण्याहून बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लोक दिवाळीसाठी गावी जात असल्याने रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून दोन दोन तास वाहने एकाच ठिकाणी उभी आहेत

उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात! शाखा पाडल्याचा वाद पेटणार?

मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसर येथे २२ वर्षांपासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा बुलडोझर लावून पाडल्यानंतर या शाखेला भेट देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येत आहेत.

सायंकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करणार असून स्थानिक व मुंब्रावासीयांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुलुंड टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT