Aishwary Pratap Singh Tomar
Aishwary Pratap Singh Tomar 
महाराष्ट्र

दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

ISSF World Cup : ऐश्वर्य तोमरची सुवर्ण कामगिरी

भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर यानं ५० मीटर रायफल शुटिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये त्यांनं ही कामगिरी केली. यामुळं भारताच्या खात्यात शुटिंगमधील दुसरं सुवर्ण जमा झालं आहे.

अंधेरीमध्ये एसी बसला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सरु

शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचं सांगितलं जात असून सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईतल्या अंधेरीमध्ये सायंकाळी ही घटना घडली.

चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीला सुरुवात

चिंचवडमध्ये पोटनिवडणूक प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी शिंदें चिंचवडमध्ये उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

आले मोहम्मद इक्बाल हे दिल्लीचे उपमहापौर

आम आदमी पक्षाचे आले मोहम्मद इक्बाल हे दिल्लीचे उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत. भाजपच्या कमल बागडी यांचा त्यांनी पराभव केला.

सुप्रीम कोर्टातील धनुष्यबाणावरील सुनावणी संपली

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने याबाबत उत्तर मागवलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि निवडणूक आयोगाकडे नोटिसीद्वारे उत्तर मागवलं आहे. तसेच जैसे थे परिस्थिती ठेवण्यात कोर्टाने सांगितलं असून पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाला नोटीस

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने याबाबत उत्तर मागवलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि निवडणूक आयोगाकडे नोटिसीद्वारे उत्तर मागवलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

आज सकाळी आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाल्यानंतर दुपारनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करीत आहेत.

शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर, 'आप'चा जल्लोष

दिल्लीच्या महापौर पदाच्या भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांचा पराभव करुन आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत.

सुनावणीला पुन्हा सुरुवात, सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

दुपारच्या ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्तासंघर्षाच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु आहे.

दापोली खेडचे कार्यकर्ते, भास्करराव जाधव, अनंत गित्ते यांचे मातोश्रीबाहेर शक्तिप्रदर्शन

लंच ब्रेकनंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार 

21 जूनच्या बहुमत निकालावर चर्चा 

असा गट दहाव्या सूचीनऊसार अपात्र ठरेल का? - सिब्बल 

शिवसेना पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न - सिब्बल 

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशमुळेच घटनात्मक पेच

पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला

बहुमत चाचणीवरील न्यायालयाच्या निकालावर सिब्बल यांचा आक्षेप 

भरत गोगवले यांची निवड अवैध - सिब्बल 

शिंदे यांचा नियम लावला तर पक्ष आणि आमदार यांच नात उरत नाही - सिब्बल 

आमदार पक्षाशी सल्लामसलत करून निर्णय घेतात- सिब्बल 

 ठाकरे गटाचे व्हीप परिपूर्ण, कपिल सिब्बल यांचा दावा 

21 जूनच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

2018 मधील शिवसेनेच्या अंतर्गत निवडणुकीची माहिती दिली होती

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची त्यासाह इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली होती.

पदाधिकारी नेमणुकीत एकनाथ शिंदे यांचं नाव चौथ्या क्रमांकावर होतं.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही नेत्यांची नेमणूक झाली तर काही जण निवडून आले.

2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नव्या आमदारांची सेना भवनात बैठक झाली

सेना भवनावरील बैठकीत सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव झाला होता.

सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नेमणूक झाली होती.

24 नोव्हेंबर 2019 ला ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तर केवळ पक्षाचे अध्यक्ष होते.

सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते आणि इतर आमदारांनी अनुमोदन दिलं 

मुख्य प्रतोद यांची निवड कशी होते याबाबत वाचन सुरू आहे 

2019 मधील कार्यकारिणीच्या पत्राच मराठीतून वाचन सुरू 

शिवसेनेच्या कार्यकरिणीतील पत्रांच सरन्यायाधीशांकडून वाचन सुरू  

आमदार पक्ष चिन्हाच्या जोरावर निवडून येतात - कपिल सिब्बल 

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची महत्त्वपूर्ण टिपण्णी

बैठकीतील निर्णय कोणाचे? सरन्यायाधीशांचा प्रश्न

सर्व आमदारांनी एकत्रित निर्णय घेतल्याचं दिसतंय

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत.

शरद पवारांनी भेट दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनातून माघार?

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी झाली असल्याचं व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट पडली असल्याचं बोललं जात आहे. काल शरद पवारांनी भेट दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनातून माघार घेतली मात्र अजूनही काही जणं आंदोलनावर ठाम आहेत. आज सकाळपासून आंदोलनात विद्यार्थ्यांची संख्या तुरळक दिसून येत आहे. नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच उपोषण आणि आंदोलन सुरूच राहणार, उपस्थित विद्यार्थ्यांनी पवित्रा घेतला आहे.

संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलिस कर्मचारी तैनात

संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जीवाला धोका असल्याचं पत्र राऊत यांच्याकडून काल पोलिस आणि गृहमंत्र्यांकडे केली होती. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान अधिकची सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.

धारावीतील आगीमुळे वाहतुकीत मोठे बदल, मुंबई ट्रॅफिक पोलिसांचं ट्वीट

मुंबईच्या कमला नगर झोपडपट्टीमध्ये पहाटे 4 च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत 25 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीमुळे परिसरातील वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्वीट केलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT