महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update : पावसाळी अधिवेशन ते इतर राजकीय अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

देशात सगळ्यात करप्ट सरकार हे डीएमके सरकार आहे- शाह

तामिळनाडूमध्ये बोलतांना अमित शाह म्हणाले की, देशात सगळ्यात जास्त करप्ट सरकार कोणतं असेल तर ते डीएमके सरकार आहे.

दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची सुटका

कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची सुटका झाली आहे. पुराव्याअभावी कोर्टाने सुटका केली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार आ. सुनिल भुसारा यांची या बैठकीला उपस्थिती आहे.

'इंडिया'च्या बैठकीपूर्वी शरद पवारांची मुंबईत बैठक

शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक होत आहे. 'इंडिया'ची मुंबईतील बैठक, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मविआची रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आदी काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

ज्येष्ठ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे आज मुंबईतील ज्येष्ठ माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा पक्षप्रवेश होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या ठाण्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा मेळावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या ठाण्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. ठाण्यातील गडकरी रंगतायन या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी सात वाजता उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मागच्या आठवड्यात हा मेळावा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे रद्द करण्यात आला होता.

मुंबईत पावसाचा जोर ओसरला

मुंबईतील पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.

अनेक जमिनीचे व्यवहार हे नोटरीद्वारे केले जातात, उपसभापती निलम गोऱ्हेंचं निरिक्षण

अनेक जमिनीचे व्यवहार हे नोटरीद्वारे केले जातात, असे निरीक्षण उपसभापती निलम गोऱ्हे यांनी नोंदवलं आहे. नोटरीचे नियमितीकरण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. महसूल विभाग विधी व न्याय विभागासोबत चर्चा करून नियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नोटरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी ठरवणार तर दोषी अधिकाऱ्यांवर होणार कार्यवाही करणार असल्याचंही त्या म्हणाल्यात.

भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट

भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. राज्य सरकारने राहुल कुल यांना क्लिन चीट दिली आहे. जिल्हा पुणे तालुका दौंडा येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत त्यांना क्लिन चीट दिली आहे. साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झाला नाही असे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे.

बोरिवली पोलिस ठाण्यात कैद्याची आत्महत्या

बोरिवली पोलिस ठाण्यात कैद्याने आत्महत्या केली आहे. दिपक जाधव असे या मृत आरोपीचे नाव आहे. दिपक हा बोरिवली पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. पुण्यात एका हत्येच्या गुन्ह्यात तो येरवडा जेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर २६ जुलै रोजी त्याचा ताबा बोरिवली पोलिसा़नी घेतलं होतं. न्यायालयाने दिपकला २८ जुलै पर्यंत कस्टडी सुनावली होती. आज सकाळी ८ च्या सुमारास दिपकने कस्टडीत गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला जवळच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले असता. डाॅक्टरांनी त्याला मयत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी रद्द

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयाने मणिपूर सरकारला खडेबोल सुनावले होते. त्याप्रकरणी होणारी आजची सुनावणी रद्द करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या खंडपीठापुढे सुनावणी करता येणार नाही. त्यामुळे मणिपूरच्या प्रकरणावरील शुक्रवार (28 जुलै) रोजी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे.

मुंबई पुणे द्रुदगती मार्गावर आजही दोन तासांचा मेगा ब्लॉक

मुंबई पुणे द्रुदगती मार्गावर आजही दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला 10 दिवस पूर्ण; आज मृतांचा सामुदायिक दहावा

रायगड जिल्ह्यातील इशार्ळवाडीमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला, तर अद्यापही अनेकजण बेपत्ता आहेत. या घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले आहेत. आज या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचा दहावा आहे. या घटनेतील मृत व्यक्तींचा दहावा सार्वजनिक स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजपूत भामटा या जमातीतील भामटा हा शब्द वगळता येणार नाही- अतुल सावे

राजपूत भामटा या जमातीतील भामटा हा शब्द वगळता येणार नाही अशी माहिती अतुल सावेंनी विधान परिषदेत दिली आहे.

अजित पवारांच्या दालनात कृषी विभागाची बैठक सुरू

अजित पवारांच्या दालनात कृषी विभागाची बैठक सुरू आहे.

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट

आज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दहावी-बारावीच्या आज होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा पेपर पुढे ढकलला असून हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे. यात दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होत आहे. परंतु सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटीदेखील जाहीर केली आहे.


देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT