महाराष्ट्र

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ डिजिटल टीम

कोपर स्थानकाजवळ AC लोकल बंद पडली

मुंबईतल्या कोपर स्थानकाजवळ AC लोकल बंद पडली आहे. कल्याण दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलची वाहतूक ठप्प झाली आहे.

भिवंडी दुर्घटनेत मृतांचा आकडा ४ वर

मुंबई जवळील भिवंडीमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.  या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा हा 4 वर पोहोचला आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

मुंबईत गोळीबार, महिला जखमी

३१ वर्षीय महिलेवर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मानखुर्दमधल्या इंदिरा नगर मंडळ परिसरातमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबारामध्ये जखमी झालेल्या महिलेवर राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हार्बर मार्गावरील वाहतूक १० मिनिटांपासून ठप्प

मुंबईतल्या हार्बर मार्गावरील लोकलची वाहतूक मागील १० मिनिटांपासून ठप्प आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक खोळंबली आहे.

पुणे विद्यापीठाचा मुख्य इमारतीमध्ये धूर, अग्निशमन दल दाखल

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत धूर निघत होता. पावसाळी काम सुरु होतं. मुख्य इमारतीच्या छतावर डांबर लावायचं काम सुरु होतं. डांबरातून धूर येत असल्यानं खबरदारी म्हणून अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं होतं.

दरी पुलाजवळ मुबंई-बंगळुरू महमार्गवर कारने घेतला पेट

कात्रज नवीन बोगद्याजवळ एका कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने कारने पेट घेतल्याचं पोलीसांनी सांगितलं.

या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेलाली नाही. कार जाळून खाक झाली असून अद्याप अग्निशमन दल पोहोचले नाही.

अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सकाळी १०.३० वाजता मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

पुण्यात चिपको आंदोलनाला सुरुवात

पुण्यात नदी सुधार प्रकल्पाला विरोध करीत पर्यावरण प्रेमींकडून चिपको आंदोलन सुरु झालं आहे.

मुख्यमंत्री शिंदे जाणार कर्नाटकात प्रचाराला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये दोन ते तीन दिवस प्रचारासाठी जाणार आहेत.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर संदीप क्षीरसागरांचे वर्चस्व

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत, या विजयाने जयदत्त क्षीरसागर यांची 35 वर्षांपासूनची सत्ता पालटली असून, महाविकास आघाडीच्या सर्वांनीच जल्लोष केला आहे.

मंचर बाजार समिती 15 जागांपैकी 14 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती 15 जागांपैकी 14 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम विजयी

कर्जत बाजार समितीत राम शिंदे - रोहित पवारांमध्ये मोठी चुरस

सध्या तरी कर्जत बाजार समितीमध्ये भाजप नेते राम शिंदे यांचा गट आघाडीवर असून 18 पैकी 15 जागेचा निकाल हाती आला आहे. यामध्ये राम शिंदे यांच्या गटाला 8 तर रोहित पवारांच्या गटाला सात ठिकाणी आघाडी मिळाली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : प्रल्हाद काकड १८० मतांनी विजयी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : चुंभळे गटाने खाते उघडले असून सहकारी संस्था भटक्या विमुक्त गटाचे उमेदवार प्रल्हाद काकड हे १८० मतांनी विजयी झाले.

भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली; 40 ते 50 जण अडकल्याची भीती

मौजे कैलासनगर (वळपाडा) इथं वर्धमान कंपाऊंडमध्ये आज १.४५ वाजताच्या सुमारास G+२ बिल्डिंग कोसळली. त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर साधारण ३ ते ४ कुटुंब राहत होते व खालच्या मजल्यात कामगार काम करत होते ते अडकले आहेत.

खंबाटकी घाटात बोगद्यातून वाहतूक वळवली

खंबाटकी घाटात वाहतूक बोगद्यातून वळवण्यात आली असून कराडजवळ अवजड वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. सध्या सातारा-रहिमतपूर-पलूस-सांगली या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरु आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचं वर्चस्व

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

धनंजय मुंडे यांची हवा, परळी पाठोपाठ अंबाजोगाईतही आघाडीवर

आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा बाजार समितीच्या निवडणुकीत पराभूत

संगमनेर कृषी बाजार समितीत थोरातांच्या पॅनलची आघाडी

संगमनेर कृषी बाजार समितीत थोरातांच्या पॅनलची आघाडी तर तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी.

बारामतीत राष्ट्रवादी पुन्हा; बाजार समितीवर झेंडा कायम

बारामती बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १७८ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपला धक्का दिला आहे.

सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने उडवला भाजपचा धुवा

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने १६ विरुद्ध 0 अशा प्रकारे ने भाजपचा धुवा उडवला आहे. व्यापारी गटात दोन उमेदवार स्वतंत्र निवडून आले आहेत.

मंत्री तानाजी सावंत यांना धक्का परांडा बाजार समितीत मविआला १८ पैकी ११ जागांवर विजयी

संगमनेर बाजार समितीत काँग्रेसची घोडदौड! विखे पाटलांना धक्का

संगमनेर बाजार समितीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात गटाने खतं उघडलं आहे. आत्ता पर्यंत थोरता गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का बसताना दिसत आहे.

हवेली बाजार समितीत राष्ट्रवादीची घोडदौड! तीन उमेदवार विजयी

हवेली बाजार समितीत राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. अजून निकाल पुर्ण जाहीर झाला नाही मात्र हवेली बाजार समितीत राष्ट्रवादीने खातं उघडलं आहे.

बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाला धक्का! मविआचा करिश्मा

संजय गायकवाडांना धक्का

बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल लागला आहे. पाच पैकी तीन बाजार समित्यावर महाविकास आघाडीने झेंडा फडकला आहे.

खेडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता

पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला विजय मिळवला आहे.

अमरावतीत भाजपचा सुफडा साफ

अमरावती जिल्ह्यात 6 बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये महाविआघाडी समर्थीत पॅनलने सर्वच 5 बाजार समित्यांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. 

कुणाचा ‘बाजार’ उठणार? कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल एका क्लिकवर

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होणार आहेत.

पुण्यात डॉक्टरकडून रुग्ण महिलेवर अत्याचार

पुणे शहरातील कात्रज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केला असून पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये पीडितेने तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी डॉक्टरचे कात्रज भागात क्लिनिक आहे. याठिकाणी पीडित रुग्ण महिला तपासणीसाठी गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT