जमैका देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या एका शाळेत विद्यार्थ्यांना कॅनबिस कँडीचे वाटप करण्यात आले होते. या कँडी खाल्ल्यामुळे ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.त्यानंतर त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.
शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे देवगिरी बंगल्यावर गेले होते.
देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची बैठक सुरू असताना तनपुरे देखील गेले होते. मात्र, तनपुरे आणि अजित पवारांची भेट न झाल्याची माहिती मिळाली आहे.
नांदेड येथील रुग्ण दगावल्याच्या घटनेवर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले आमदारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना वेगळं हॉस्पिटल आणि सामान्य नागरिकांना वेगळे हॉस्पिटल हे कुठेतरी थांबलं पाहिजे. 75 वर्षानंतर आजही सरकारला भरोसा निर्माण करता आला नाही. मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की शिवसेना असो या भाजप असो. त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील बच्चू कडू म्हणाले.
लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देशातील मोदी सरकारकडून वारंवार होत आहे. आज दिल्लीमध्ये अनेक मोठ्या पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यात येत आहे. मोदी सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींविरोधात सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मनुष्य बळाबाबत डीन यांना तात्काळ कंत्राटदारी पदावर भरण्याचे अधिकार दिले आहेत. क्लास थ्री ही पदे या महिन्याअखेरीस संपूर्ण राज्यात भरणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच प्रत्येक मृत्यूची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचही मुश्रीफ यांनी नमूद केलं.
महाराष्ट्रातील भाजपप्रणीत येड्यांच सरकार हे लोकांच्या जीवावर उठलेल सरकार आहे. आधी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये लोकांचा जीव गेला. आता नांदेडमध्ये तर रेकॉर्ड ब्रेक झाला. ३८ च्या वर लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंतचा जीव गेला. या सरकारच्या कामकाजाचा निषेध, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या दिल्ली भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे. सध्या सोयाबीनवर पिकावर पिवळा मोझॅक नावाचा रोग आलेला आहे. या रोगामुळे सोयाबीनचे पाने पिवळी पडत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनिल देशमुख, रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 36 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे हिंगोली-नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयास भेट दिली. तेव्हा स्वछतेचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. संतापलेल्या हेमंत पाटीलांनी अधिकाऱ्यांना स्वछतागृह साफ कारायला सांगून ,स्वतः उभे राहून सर्व साफ-सफाई करून घेतली.
अजित पवार कॅबिनेट बैठकीला गैरहजर आहेत. आजारपणाचं कारण देत अजित पवारांनी कॅबिनेटकडे पाठ फिरवली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या याचिकेवर 9ऑक्टोबर ला पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाने राज्य सरकारला या प्रकरणाशी संबंधित असलेले कागदपत्र सादर करायला सांगितले आहेत. नायडू यांनाही स्किल डेवलपमेंट घोटाळा प्रकरणी FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. नायडू यांना 9 सप्टेंबर या पहाटे अटक झाली होती.
हार्बर रेल्वे मार्गावरील घोळ सुरूच आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दालनात उपस्थित आहेत. कॅबिनेटपूर्व बैठकीसाठी हे मंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अनिल पाटील, आदीती तटकरे, संजय बनसोडे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ हे मंत्री फडणवीसांच्या दालनात आहेत.
हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला मंत्रालयात दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर मुश्रीफ नांदेडसाठी निघणार आहेत. नांदेडमधील परिस्थितीचा ते आढवा घेणार आहेत.
सलग सुट्ट्यानंतर सायन पनवेल महामार्ग ठप्प झाला आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. रुग्णवाहिकेला सुद्धा वाट काढावी लागली. सलग चार दिवसांच्या सुट्टी नंतर चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
राज्य सरकार अस्तित्वातच नाही. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबईच्या हार्बर मार्गावरील सीएसटी आणि डाऊन पनवेल दिशेच्या लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. आज कामाचा दिवस असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. हार्बर मार्गावर शनिवारपासून ३८ तासांचा मेगाब्लॉक होता जो काल संध्याकाळी संपला, त्यानंतरही हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांचे हाल कमी झालेले नाहीत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी, असं ट्विट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
राज्यातील सर्वपक्षीय 22 आमदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उद्या सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत. विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या प्रश्नाबाबत ही भेट घेतली जाणार आहे.
राज्यात धनगर समाजाला आदिवासीच्याप्रमाणे आरक्षणाची मागणी वाढत असताना या भेटीला महत्त्व आले आहे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाडवी यांच्यासह इतर आमदारांच शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेणार आहे. राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापत असताना या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
मराठवाड्यातील नांदेड शहरात शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे, यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.