LIVE Update
LIVE Update 
महाराष्ट्र

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

सकाळ डिजिटल टीम

विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार

रवींद्र धंगेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट

रवींद्र धंगेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जावून भेट घेतली. यावेळी धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे देखील उपस्थितीत होते. २०१७ साली मनसे सोडून धंगेकर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता

एप्रिल-मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार!

एप्रिल-मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. 

गुजरात : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे अहमदबाद येथे आगमन झाले. 

उद्धव ठाकरे २६ मार्चला मालेगावात घेणार सभा

त्रिपुरा : अमित शहा आणि जेपी नड्डा राज्य अतिथीगृहात दाखल झाले

जेपी नड्डा व अमित शहा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, त्रिपुरा भाजपचे प्रभारी संबित पात्रा, महेश शर्मा, महेंद्र सिंह, टिपरा मोथा प्रमुख प्रद्योत देब बर्मा यांच्यासोबत बैठक घेत आहेत.

इम्रान खान यांना आज अटक होण्याची शक्यता!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इम्रान यांना अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचं एक पथक आज (बुधवार) लाहोरला रवाना झालं आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणार - देवेंद्र फडणवीस

राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील नुकसानग्रस्त भागाची माहिती सरकाने तातडीने मागविली आहे.

उमेश यादव दुसऱ्यांदा बनला बाप

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचं दोन आठवड्यापूर्वी निधन झालं. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या कुटुंबाला गोड बातमी मिळाली. उमेश यादव दुसऱ्यांदा बाप बनला. याची माहिती त्यानं सोशल मीडियावरून दिली आहे. उमेश यादवने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये मुलगी जन्माला आल्याचं म्हटलं आहे.

आमदार बच्चू कडूंना जामीन मंजूर

आमदार बच्चू कडूंना जामीन मंजूर झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा

आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर बातमी येथे वाचा - MLA Bacchu Kadu : बच्चु कडूंचे दिवस फिरले! कोर्टाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा

मनसुख  हीरे हत्याप्रकरणातील प्रदीप शर्मा यांच्या कोठडीत वाढ 

मनसुख हीरे हत्याप्रकरणातील प्रदीप शर्मा यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

मुंबईच्या समुद्रात नौदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं, 3 जणांना वाचवलं

भारतीय नौदलाच्या एएलएच, मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना, किनाऱ्याजवळ अपघात झाला. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांच्या क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन

अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली आहे. तर अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनाने मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

रवींद्र धंगेकर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल 

रवींद्र धंगेकर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

रवींद्र धंगेकरांनी घेतली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

कसबा विधानसभेचे नव निर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. रवींद्र धंगेकर यांनी बेंगळुरू येथे भेट घेतली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. कसबा विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खर्गे यांच्याकडून धंगेकर यांचे अभिनंदन केलं. यावेळी अनेक विषयांवर देखील चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनजी जोशी उपस्थित होते.

नवाब मालिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ 

नवाब मालिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नवाब मालिक यांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे.

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाबाबत  अजित पवारांकडून स्थागन प्रस्ताव

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाबाबत  अजित पवारांकडून स्थागन प्रस्ताव देण्यात आला आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधकांची घोषणाबाजी चालू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे अशी मागणी विरोधक करत आहेत. मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी म्हणत आंदोलन करण्यात येत आहे.

हक्कभंग नोटिशीला अद्याप उत्तर दिलेलं नाही - संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान केलं होतं. या विधानामुळे राऊत चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांना पाठवलेल्या हक्कभंगाच्या नोटीसला त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. अशी माहिती आज त्यांनी दिली.

भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे ते दिसतंय - संजय राऊत 

आम्ही आणि जनता पूर्णपणे शुद्धीवर आहोत

आज सदनात घुमणार महिला आमदारांचा आवाज; विधानसभेत महिला मांडणार लक्षवेधी

आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडणार आहे. आजच्या विधानसभा कामकाजात आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे. आणि यामध्ये यशोमती ठाकूर, देवयानी फरांदे, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, यामिनी जाधव, जयश्री जाधव, सरोज अहिरे यांचा समावेश असणार आहे.

मुंबईत काही भागांत उद्या १० टक्के पाणीकपात

शहर आणि पूर्व उपनगरांत गुरुवारपासून दोन दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. ९ मार्च सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत ही पाणीकपात राहणार आहे. 

विधिमंडळाबद्दल केलेल्या व्यक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊतांवरील हक्कभंगावर आज निर्णय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभेत मांडलेल्या हक्कभंगावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राऊतांकडे 48 तासांत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यासाठी हक्कभंग समितीही नव्यानं गठीत करण्यात आली होती. आता या समितीची आज बैठक होण्याची शक्यता आहे.

आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार 

आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. देवेंद्र फडणवीस हा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत.

शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची विरोधकांची सरकारकडे मागणी

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांनी यासंबधी प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, आम्ही सरकारकडे यासंबधी मागणी आज करणार आहोत. मी काल पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांणी त्यांचे प्रश्न मांडले. त्यांना तातडीने मदत करण्यात यावी असंही ते पुढे म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा

आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. विविध मुद्यावरुन आज विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT