जालन्याच्या अंतरवाली येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालेलं आहे. साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंबंधीची बैठक होणार आहे.
पुण्यातील चांदणी चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत
G20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत.
सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. आता योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जी 20 शिखर परिषदेसाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दिल्लीत दाखल झाले आहेत.
मुंबई शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामुळे वाहतूक मंदावली आहे.
पुणे शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पवना धरण पूर्ण भरले आहे. यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
त्रिपुरामध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
IPS रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टानं IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही FIR रद्द केले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.
काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे असा धीर उद्धव ठाकरेंनी अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
उध्दव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी संगमनेर, पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न ठाकरेंसमोर मांडले आहेत.
उध्दव ठाकरे सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत. ते काही वेळापुर्वी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. ते दुष्काळी भागांचा करणार दौरा करणार आहे.
राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्रतापगडापासून काही अंतरावरच ही दरड कोसळली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. तर आज जरांगे यांच्या उपोषणाचा ११ वा दिवसा आहे. आम्ही सरकारसाठी एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता मात्र अजून सरकारचा निरोप आलेला नाही. आज आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पाहत आहोत. सरकारचा निरोप येईपर्यंत शिष्टमंडळाचे नाव जाहीर करणार नाही. तज्ञ, वकील, शेतकरी असे लोक शिष्टमंडळात असतील. आमच्याकडून देखील चर्चेची दार खुली आहे. उद्या दिवसभर मी सरकारची वाट पाहीणं. सरकारसाठीच मी सलाईन घेतलं. उद्या शेवटचा दिवस आहे. यानंतर हे सर्व बंद करणार आहे. सलाईन काढणार आणि पाणी देखील सोडणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असं उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
अंधेरी सहार रोडवर विजेचा झटका लागून तीन गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिग्नल पोलला शॉर्ट सर्किट झाल्याने दुर्घटना घडली आहे. विलेपार्ले पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल पोलचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
महाराजांची वाघनखं राज्यात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनला जाणार आहेत. महाराजांची वाघनखं हा अनमोल ठेवा आणण्यासाठी स्वतंत्र जीआर काढण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार आणि खात्याचे प्रमुख सचिव विकास खरगे लंडनला जाणार आहेत. वाघनखं आणण्यासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. २९ सप्टेंबरला मुनगंटीवार लंडनला जाणार आहेत.
बुलढाण्यामध्ये बस चालकाला झोप लागल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण, पावसाने राज्यभरात लावलेली हजेरी, दिल्लीत पार पडणारी जी-२० बैठक, यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.