Maharashtra State Election Commissioner addresses the press, confirms post-Diwali local body elections without VVPAT machines and over multiple phases.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharshtra Local Body Elections: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडका दिवाळीनंतरच

Maharashtra State local body elections Update: एकाच टप्प्यात निवडणुका होणार नाहीत अन् व्हीव्हीपॅट मशीनचाही वापर केला जाणार नाही

Mayur Ratnaparkhe

Maharashtra local body elections after Diwali without VVPAT : राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने एकाच टप्प्यात निवडणुका न होता, टप्प्याटप्प्यानं होणार आहेत. मात्र आधी कोणती निवडणूक होईल हे अद्याप तरी निश्चित नाही. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही, अशी माहिती आता समोर आली आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायसमिती या सर्व निवडणुका जर एकत्रित घेतल्या गेल्या तर त्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नाही, त्यामुळेच या निवडणुका टप्प्याटप्प्यानं घेतल्या जातील असं बोललं जात आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारपरिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत माहिती दिली. राज्यातील निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही, कारण प्रभाग पद्धती असल्याने एकपेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात, मतांची मोजणी करावी लागत असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकांमध्येही होणार नाही. जेव्हा एखाद्या निवडणुकीत एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला दिवाळीनंतरच म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरपासून सुरुवात होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. ही संपूर्ण मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारेच पार पाडली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात मतदानयंत्राची कमतरता जाणवणार असल्याने, अन्य राज्यांमधून अतिरिक्त मतदानयंत्र मागवले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: टीकाकारांना खणखणीत उत्तर! शुभमन गिल होणार एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार? रोहित शर्मा किती काळ खेळेल?

Latest Marathi News Updates Live : नाशिकच्या वाहतूक कोंडीवर उतारा! मुंबई पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय

Mahadevi Kolhapur Return : महादेवीची घरवापसी लांबणार, कायदेशीर प्रक्रियेने कोल्हापुरकरांच्या चळवळीला यश येणार का?

Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढू, पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक; मानाच्या मंडळांकडून निर्णय जाहीर

Besan Tomato Paratha: सकाळच्या नाश्त्यात 20 मिनिटांत बनवा रुचकर बेसन टोमॅटो पराठा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT