Tanaji Sawant Sakal
महाराष्ट्र बातम्या

Tanaji Sawant : ‘मविआ’ सरकार पाडण्यापूर्वी एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्या शंभर ते दीडशे बैठका घेतल्या

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत शंभर ते दीडशे बैठका घेतल्या.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत शंभर ते दीडशे बैठका घेतल्या.

परंडा - (जि. धाराशिव) - राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत शंभर ते दीडशे बैठका घेतल्या. अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केला.

सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. २८) येथील पंचायत समितीच्या प्रांगणात कुस्ती स्पर्धा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा याच्या नेतृत्वाखाली मागील विधानसभेची निवडणूक लढवली गेली. जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. चांगले काम करूनही आपल्याला मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही.

त्यामुळे पुन्हा ‘मातोश्री’ बंगल्यावर पाय ठेवणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांना त्याच वेळी ठणकावून सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात पहिले बंड धाराशिव जिल्हा परिषदेत घडवून आणले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. याला आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती.’’

बोलतो ते करतोच

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपणच पुढाकार घेतला. जे बोलतो ते करतोच, असे सांगून, आगामी काळात विकासात पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे धाराशिव जिल्हा असेल, अशी ग्वाही तानाजी सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT