Monsoon Update sakal media
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update| महाराष्ट्रातला मॉन्सून संपला; आता थंडीची चाहूल

राज्यात दाखल झाल्यानंतर चार महिन्यांनतर मॉन्सूनने गुरुवारी परतीचा निरोप घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतला आहे. त्यामुळे आता राज्याच्या अनेक भागांत हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात दाखल झाल्यानंतर चार महिन्यांनतर मॉन्सूनने गुरुवारी परतीचा निरोप घेतला आहे. हवामान विभागाच्या नवीन वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर ही मॉन्सूनच्या राज्यातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख होती. मात्र त्यानुसार वेळेच्या एक दिवस आधीच मॉन्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे.

सध्या बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र हे पुढील दोन दिवसात केरळच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र २४ तासांत ओडिशा-आंध्र प्रदेशकडे प्रवास करेल. त्यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार होत विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

शहर आणि परिसरात पुढील आठवडाभर दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. सध्या शहरात हवामान कोरडे असून दिवसा कडकडीत ऊन असल्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. शहरात गुरुवारी ३२.९ अंश सेल्सिअस कमाल आणि १९.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. दोन्ही कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सुमारे १ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदले गेले. तर पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT