महाराष्ट्र बातम्या

Mansoon Update: राज्यात पावसाचा जोर वाढला, चार जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

राज्यात विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली

सकाळ डिजिटल टीम

राज्यात विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई, पुण्यासह, ठाणे, नवी मुंबई, पालघर, मराठवाडा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

नवी मुंबई, पनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस चालू आहे. तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राज्याभरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचंही विभाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. गेली काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

पावसाने चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळे उभी पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळे पिकांनी जीवदान मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: आधी ईव्हीएमच्या नावाने ओरडले, आता बिनविरोध विजयावरून आरडाओरड; फडणवीसांची विरोधकांवर आगपाखड

Mumbai Muncipal Election: शिवसेना विरुद्ध शिवसेना! ठाकरेंचे शिलेदार शिंदेंच्या माजी नगरसेवकांशी भिडणार

Latest Marathi News Live Update : बीड जिल्ह्यातील माजलगावच्या दत्तनगर शाळेतील मुलांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता

Magh Month 2026: माघ महिन्यात अवश्य करा 'ही' कामे, लाभेल सुख-समृद्धी

Chikhaldara News : मेळघाटमध्ये आठ महिन्यात १०७ बालमृत्यू; चार माता मृत्यू

SCROLL FOR NEXT