Latest Marathi News Live Update

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Live Update : आज राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 19 october 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सूरज यादव

Pune Live : पुण्यातील चव्हाण वाडा चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

पुण्यातील चव्हाण वाडा चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

४ फायर ब्रिगेड गाड्या आल्या आहेत

मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत आग लागल्यामुळे खळबळ

Nagpur Live : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयरोजगार मिळवून देण्यासाठी ई रिक्षा वाटप कार्यक्रमाचे आयोजन..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , उपस्थित राहतील. नागपूरच्या ईश्वर देशमुख महाविद्यालय प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन..

राज्य सरकारने उसाचे दर वाढवले ​​

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेट दिली आहे. कारण राज्य सरकारने उसाचे दर वाढवले ​​आहेत. लवकर येणाऱ्या वाणांचा दर ४०० रुपये प्रति क्विंटलवरून ४१५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. उशिरा येणाऱ्या वाणांचा दरही ३९३ रुपये प्रति क्विंटलवरून ४०८ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने देशातील सर्वाधिक ऊस दर शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jalgaon News: मुक्ताईनगर पं.स.ची २० रोजी आरक्षण सोडत

निवडणूक आयोगाने १ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी १३ रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती. मुक्ताईनगर पंचायत समिती करीता आरक्षण सोडत चुकीची झाल्याने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. या अनुषंगाने विशेष सभेचे २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

Mumbai Crime: पत्नीचा खून करून अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या आरोपीला अटक

11 ऑक्टोबर रोजी वाकोला परिसरात महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीचा खून करून पळ काढला होता. मुंबई गुन्हे शाखा व वाकोला पोलिसांच्या संयुक्त तपासातून आरोपीचा मागोवा घेण्यात यश आले. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सततच्या शोधमोहीमेतून आरोपी अखेर जेरबंद झाला.

Nagpur Live: नागपूर जिल्ह्यात दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ई-रिक्षा वाटप

नागपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-रिक्षा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके यांचा समावेश आहे.

Tanvi Sharma Live: भारताच्या तनवी शर्माने १७ वर्षांचा दुष्कळ संपवत ज्युनियर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकलं मेडल

ज्युनियर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम सामन्यात भारताच्या तनवी शर्माला थायलंडच्या अन्यपत फिचितप्रीचसक हिच्याविरुद्ध ७-१५, १२-१५ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण असं असलं तरी तिने या स्पर्धेत भारताची १७ वर्षांची पदकांची प्रतिक्षा संपवली आहे. भारताला यापूर्वी शेवटचे या स्पर्धेत सायना नेहवालने २००८मध्ये मिळवून दिले होते. तिने २००८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Ajit Pawar Live: कामात पारदर्शकता ठेवा! नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी अजित पवारांचा सल्ला

राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले, पुढे काम करायचं असेल तर कामात पारदर्शकता ठेवणं, लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देणं आणि क्वालिटी काम करून दाखवलं महत्त्वाचे आहे. संपर्क ठेवा, विनाकारण निवडून आला आणि दुर्लक्ष केलं, तर चालत नाही. आत्ताची कामकाजाची पद्धत वेगळी आहे.

Live :  लालवाडी फाट्याजवळ कंटेनरने दुचाकी चालकाला चीरडले; वीस वर्षीय युवक जागीच ठार

जालना जिल्हयातील अंबड -जालना महामार्गावरील लालवाडी फाट्याजवळ शनिवारी (ता.18) सकाळी साडे नऊ वाजता मंठा तालुक्यातील गेवराई येथील गोविंद लक्ष्मण गिऱ्हे (वय 20) वर्ष हा तरुण जालना शहराकडून अंबडकडे जात असताना अंबडकडून जालना शहराकडे जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला महामार्गावरून खाली खड्यात फरफटत घेऊन जात चिरडले आहे.

Jalgaon Live : जळगाव विमानतळाचा विकास ठप्प; प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपासून नाही

जळगाव विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून झालेली नाही. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार स्मिता वाघ असून, बैठक झालेली नसल्यामुळे विमानतळाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबितच राहिले आहेत. परिणामी, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, विमानतळ विस्तारीकरण, टर्मिनल इमारत आणि ॲप्रानसारख्या तांत्रिक बाबी मार्गी लागण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Bhusaval Live : पैसा नको, नोकरी किंवा पर्यायी जमीन द्या! भुसावळ-मनमाड चौथ्या रेल्वेमार्गासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची रेल्वे प्रशासनावर नाराजी

भुसावळ-मनमाड या महत्त्वाच्या चौथ्या रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाबाबत नागापूर येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडचणी मांडताना रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. ‘पैसा नको, नोकरी द्या’, ‘आमच्या वारसांना रेल्वेत सामावून घ्या’, ‘पर्यायी जमीन द्या’ अशा मागण्या करीत व्यथा मांडल्या; तर घोटी ते त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी मोजणी सुरू केली. या संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. घोटी ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग १६० शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन देत शासनाचा निषेध करण्यात आला.

Pune Live : शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा सकल हिंदू समाजाकडून आरोप

शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा सकल हिंदू समाजाकडून आरोप

शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाकडून आज शिव वंदना चे पठण

Satara Live: मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार -अभय जगताप

महाराष्ट्रात मतदार याद्यांवरून घोळ असताना साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी केला आहे. म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांबाबतच्या हरकती त्यांनी दाखल केल्या होत्या यावेळी एकच नाव तीन वेळा मतदार यादीत येत असल्याने त्यांनी या मतदार यादीवर आक्षेप व्यक्त केला आहे...

Maharashtra Live Update: निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर.

यादीत घोळ असल्याचं आयोगाकडून मान्य- नांदगावकर.

Liveupdate: महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर. सर्वपक्षीय विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद. आयोगाविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा. निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालंय असे संजय राऊत म्हणले. महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार असेही संजय राऊत म्हणाले.

LiveUpdate: बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे.

Jalgaon Accident: जळगावात रिक्षाचा अपघात, चंद्रकांत पाटलांकडून मदत

जळगाव येथे रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली. याचवेळी मा.आ.चंद्रकांत पाटलांची गाडी घटनास्थळावरून जात असताना चंद्रकांत पाटील यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच तातडीने अँब्युलन्स बोलावून अपघाताने हादरलेल्या प्रवाशांना धीर देखील दिला.

Chh. Sambhajinagar: तलवारीसह परिसरात फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

फुलंब्री हद्दीतील सावंगी येथे शनिवारी (ता.१८) रात्री वाजेच्या सुमारास 9 वाजता एक युवक दोन धारदार तलवारी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती फुलंब्री पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई करून सदर युवकाला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून दोन्ही तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

Nashik Live: लासलगाव बसस्थानकात धोकादायक स्थिती; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

लासलगाव डेपोला नुकत्याच मिळालेल्या १० नवीन बसपैकी ४ ते ५ बस सध्या थेट "सलाईन"वर आहेत. एका बसची समोरील काच तुटलेल्या अवस्थेत असूनही ती लासलगाव–नाशिक–औरंगाबाद या मार्गावर रात्रीच्या वेळेस धावली. या तुटक्या काचेमधून चालकाला समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नसल्याचं प्रवाशांनी सांगितलं आहे. यामुळे केवळ चालकाचं नव्हे तर बसमधील सर्व प्रवाशांचं जीवन धोक्यात आल आहे. त्यातच, डेपोतील यांत्रिक काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे अनेक गाड्या अर्ध्या रस्त्यात बंद पडत आहेत. परिणामी प्रवाशांना खोळंब्याचा आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

Nashik Live: लासलगावमध्ये सुरूची मिठाई उपक्रमाचा गोडवा कायम, 80 टन मालाची विक्री

लासलगावमध्ये गोरगरिबांना दिवाळीच्या सणात गोडवा अनुभवता यावा, यासाठी लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान गेली १९ वर्षे एक अनोखा उपक्रम राबवत आहे. ‘ना नफा ना तोटा" तत्त्वावर सुरूची मिठाई’ या उपक्रमांतर्गत परिसरातील गरजू शेतकरी, मोलमजूर, आणि सामान्य कुटुंबांना फरसाण व मिठाईचे तब्बल १८ प्रकार अगदी सवलतीच्या दरात दिले जातात. या उपक्रमाने आतापर्यंत ८० टन मालाच्या विक्रमी वाटपाचा टप्पा गाठला आहे.

Ahilyanagar Live: अहिल्यानगरमधील ६ डॉक्टरांवर गैरप्रकारावरून गुन्हे दाखल

अहिल्यानगर येथील काही डॉक्टरांवर कोविडमधील गैरप्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शरीरचे अवयव तस्करी, प्रेताची विल्हेवाट लावणे असे अनेक आरोप त्यांच्यावर असल्याची माहिती मिळाली आहे.

Live: पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर 12 स्वराज्य नगरी या ठिकाणी पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात एक चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जर्मन शेफर्ड श्वाना चिमुकल्या मुला हल्ला करत असतानाचा विडियो सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

Live: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली स्थानकाच्या नियंत्रण कक्षाला भेट

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकामध्ये नियंत्रण कक्षाची पाहणी केली, जिथे सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुविधांवर सीसीटीव्हीद्वारे सतत लक्ष ठेवले जाते.

Live: माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट..

आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी... कर्डिले कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची दिली ग्वाही

Raj Thackeray : सभांना गर्दी मिळते पण मत नाही : राज ठाकरे

Raj Thackeray : सभांना गर्दी मिळते पण मत नाही : राज ठाकरे

सभांना गर्दी मिळते पण मत नाही, हे निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळेच होत असल्याचे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.

मतदार यादी सुधारण्याची मागणी केली की सत्ताधारी पक्ष रागावतात...

सत्ताधाऱ्यांनी मतांवर शेण फासलं आहे, आणि निवडणूक आयोग निष्पक्ष नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Raj Thackeray Live : राज ठाकरेंनी मतदार यादीवरून सरकारला घेरलं

मी २०१६ पासून तुम्हाला सांगत होतो निवडणुक मतदार यादीत घोळ आहे.

सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो मी माझी २० हजार मते बाहेरून आणली.

एकनाथ शिंदे यांचे आमदारांनीही अशी कबुली दिली होती.

Raj Thackeray : मुंबईतील मनसे मेळाव्यासाठी राज ठाकरे दाखल

Raj Thackeray : मुंबईतील मनसे मेळाव्यासाठी राज ठाकरे दाखल

बाळानांदगावकर यांनी केलं स्वागत, राज ठाकरे सरकारविरोधात कोणता बॉम्ब फोडणार याकडे लक्ष

Ravindra Dhangekar Live : मुरलीधर मोहोळ हे हतबल- रवींद्र धंगेकरांचा पलटवारक

केंद्रीय राज्यमंत्री यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणात सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण देत रविंद्र धंगेंकर हे बिळातील उंदीर असल्याची टीका केली यावर रविंद्र धंगेकरांनी पलटवार करत मोहोळे हतबल झाल्याचे दिसून येते असा पलटवार केला आहे.

Murlidhar Mohol Live : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

पुण्यातील एका ट्रस्टची जमीन हडपल्याच्या आरोपावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना स्पष्टिकरण दिले आहे. मी या एलएलपी कंपनीतून २०२४ मध्येच बाहेर पडलो आहे. आरोप करण्याआधी राजू शेट्टी यांनी माझ्याशी बोलायला हवं होते असे मोहोळ म्हणाले.

Mumbai Live : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

राज ठाकरे आज मुंबईतील गटाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत यासाठी गोरेगावमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Nagpur Live : नांदेड-नागपूर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; दोन ठार, आठ जखमी

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात जेसीबी, आयशर आणि कार यांच्यात झाला. लातूरहून देवगुरे कुटुंब चंद्रपूरला मुलगी पाहण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. अपघातात सॉफ्टवेअर अभियंता आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Live : मालेगावमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४७ कोटींचे अनुदान; दादा भुसे यांचा तीन दिवसांत वितरणाचा आदेश

मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान तातडीने वितरीत करण्याचे आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार, ५४ हजार हेक्टर क्षेत्रातील ८६ हजार लाभार्थ्यांसाठी ४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, पुढील तीन दिवसांत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Pandharpur News : पंढरपुरात ३० लाखांची सुगंधी तंबाखू जप्त

पंढरपुरात ऐन दिवाळीत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू केली आहे. या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. तब्बल 14 लाख रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. एका टेम्पो मधून 30 पोती सुगंधी तंबाखू नेली जात होती. पोलिसांना याची माहिती मिळताच छापा टाकून कारवाई केली. अन्न व औषध नियमाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News Updates : नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले, दोघांचा मृत्यू

नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडल्याची घटना घडलीय. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Weather Updates : मराठवाड्यात ढगाळ वातावरण, दिवाळीत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

दिवाळीत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातलं हवामान संमिश्र राहण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस नसला तरी मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kolhapur News Updates : धनत्रयोदशीनिमित्त अंबाबाईची धन्वंतरी रुपात अलंकारिक पूजा

धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. दीपावलीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही पुजा आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर ,श्रीनिवास जोशी यांनी बांधली. धन्वंतरी रूपातील अंबाबाई देवीची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत थंडी गायब, 'ऑक्टोबर हिट' चा चटका वाढला, आज राज्यातील 'या' भागांत पावसाचा इशारा

Devgad Hapus Mango : फळांचा राजा आला बाजारात; दिवाळीत 'देवगड' हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update : परवानगीसाठी प्रशासनाकडे आता तगादा लावणार नाही; काळा दिन फेरी काढण्‍याचा समितीचा निर्धार

Panchang 21 October 2025: आजच्या दिवशी तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

MLA Rohit Pawar: सरकारला तुकोबांनी सुबुद्धी द्यावी : आमदार रोहित पवार; संजय शिरसाट यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT