Shubhangi Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Shubhangi Patil: पराभवानंतर शुभांगी पाटलांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाल्या...

नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजीत तांबे विजयी

रुपेश नामदास

नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला.

त्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "सामान्य घरातील लेकीला 40 हजार मते पडणं हे एका विशेष आहे, झाशीची राणी लढली, तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही" अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली आहे.

मला कोणताही राजकीय वारसा नाही, माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील नाही. तरी देखील मला पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळाली जनतेचे आभार मानते. महाविकास आघाडीचे आभार मानते.

मी शिवसैनिकांचे आभार मानते, झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे.तर त्यांनी नाव न घेता सुधीर तांबे यांना टोला लगावला त्या म्हणाल्या, 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहित आहे, आता त्याचा वारसा काय करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानांपैकी 1 लाख 29 हजार 456 इतकं मतदान पार पडलं होतं. यानंतर काल याची मतमोजणी पार पडली.

यामध्ये पाचव्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT