Maharashtra MLC Election esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra MLC Election : BMC निवडणुकपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळाले शुभसंकेत

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने मैदान मारलं.

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने मैदान मारत भाजप शिंदे गटाला धक्का दिला आहे. महाविकास आघाडीने ५ पैकी ३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंना शुभसंकेत मिळाले असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (Maharashtra MLC Election Uddhav Thackeray BMC Mumbai )

निवडणूकीत भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणूकीत ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायाला मिळाला.

बंड होणार हे उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी आधीच सांगितलं होत; अजित पवारांचा गौप्यस्फोट

भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का

देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपुर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.

औरंगाबादेतून विक्रम काळे विजयी

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा विजयी झालेत. वडणूकीत विक्रम काळे यांना पारड्यात मतदारांनी भरभरून मतं टाकली असून त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३७ मतांनी पराभव केला आहे.

Shubhangi Patil: पराभवानंतर शुभांगी पाटलांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाल्या...

तर, दुसरीकडे अमरावती निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० मतं, तर रणजित पाटील यांना ४१ हजार ०२७ मतं मिळाली आहेत. मात्र, अद्याप निकाल हाती आलेला नाही.

मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंना शुभसंकेत

महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर झालेल्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघांसाठी अशा एकूण पाच विधानपरिषदेच्या जागांसाठीची निवडणूक महत्वाची मानली गेली होती.

भाजपनं या निवडणुकीतल्या पाचही जागा लढवल्या. या निवडणुकीची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतील होती.

भाजपाच्या वाट्याला आलेला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे नागपूर शिक्षण मतदारसंघाचा. निकालापूर्वी भाजपने ५ जागांवर दावा केला होता. मात्र, निकाल पाहता महाविकासआघाडीच ताकद कुठेतरी अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: 'हेल्थ इन्शुरन्श'बाबत मोठी बातमी! कंपन्यांना मनमानीपणे पैसे उकळता येणार नाहीत; IRDAI कडून हालचाली

Maharashtra Politics: पालघरमध्ये राजकीय उलथापालथ! शिंदे शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश

Kashi Vishwanath White Owl: काशी विश्वनाथ मंदिरावर पांढऱ्या घुबडाचे दर्शन; जाणून घ्या त्यामागचा अध्यात्मिक संदेश

Asia Cup 2025: मानलं संजू सॅमसन ! तापाने फणफणला होता, उपचार घेऊन हॉस्पिटलमधून थेट मॅच खेळायला आला अन्...

Viral Video : भटक्या कुत्र्यांपेक्षा यांचाच राडा! पोलिसांपुढंच रिलस्टार महिलेनं केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणाले तुम्हाला लाज...

SCROLL FOR NEXT