पहिल्या टप्प्यात प्रश्नोत्तरे घेण्यात आली. यावेळी विविध आमदारांनी आपले प्रश्न मांडले. त्यानंतर दोन लक्षवेधी घेण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई अनधिकृत बांधकाम आणि गटारांचा प्रश्न मांडण्यात आला. दुपारी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी २९३ चा प्रस्ताव मांडला आणि त्यावर अनेक नेत्यांची भाषणे झाली. यामध्ये भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर यांच्या भाषणांनी लक्ष वेधून घेतलं.
विधानपरिषदेचा दुसरा दिवस अंबादास दानवेंनी उपस्थित केलेल्या किरीट सोमय्या यांच्यासंदर्भातील व्हिडिओ प्रकरणावरून गाजला. त्याचबरोबर विधानपरिषदेच्या उपसभापतींच्या अपात्रतेवरून विरोधकांनी गोंधळ घातला, यावेळी गृहमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं. त्यानंतर विद्यापीठे, शिक्षण यावर चर्चा करण्यात आली.
अंबादास दानवे यांचे किरीट सोमय्या यांच्यावरील आरोप आणि सभापतींकडे सोपवलेल्या पेन ड्राईव्हमुळे आजचा विधानपरिषदेचा दिवस गाजला.
डॉ.किरण लहामटे यांनी विधानसभेत २९३ अन्वये प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आणि त्यांच्या हितासाठी ज्या ५२ योजना सरकारकडून राबवल्या जातात त्यासंदर्भात हा प्रस्ताव होता. त्यानंतर अनेक नेत्यांची भाषणे झाली. चर्चा झाली. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव यांच्या भाषणांनी लक्ष वेधले.
मरीनड्राइव्ह येथील महिला शासकीय वसाहती गृहात घडलेली घटना निंदनीय आहे. या इमारत डागडुजी करणे गरजचे असल्याने ८ कोटी मंजूर केले. कालांतराने संपूर्ण इमारतच पाडून नवी बांधावी लागणार त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पालकांनी परीक्षापर्यंत वेळ मागितला.
पीडित मुलगी एकटी त्या मजल्यावर रहात नव्हती. आजू बाजूला मुली होत्या. पण ज्यांच्या परीक्षा झाल्या त्या घरी गेल्या आणि ही एकटीच होती. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे कृत्य सीसीटीव्हीत आले.
आता आपण ती इमारत पाडत आहोत, मात्र ४०० मुलीच्या वसहतीगृहासाठी वांद्रे येथे नव्याने अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीत आपण तात्पुरती व्यवस्था केली आहे. तिथे ६०० मुली वास्तव्याला राहू शकतात.
या घटनेनंतर वसहतिगृहाच्या अधिक्षीकांना निलंबित केले. या घटनेनंतर वरिष्ठ महिला अधिकारी यांची समिती नेमली आहे. यात आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर आणि इतरांचा समावेश आहे. महिलांच्या प्रत्येक फ्लोअरवर सीसीटिव्ही, खोलीत पॅनिक अलाराम, मजबूत सुरक्षाभिंत असे सुचवण्यात आले आहे.
मुलीच्या भावाला अमरावती येथे पालकांच्या मागणीनुसार कंत्राटी नोकरी दिलेली आहे. बहुसंख्य मागण्या मान्य केलेल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. गुवाघर येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला पण सरकारने ते कुटुंब फक्त माझ्या मतदारसंघात असल्यामुळे मदत जाहीर केली नाही असा आरोप करत एकनाथ मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तुम्ही एवढे निष्ठुर आणि निर्दयी कसे झालात? असा सवाल भास्कर जाधवांनी केला आहे.
रवींद्र वायकर यांनी विधानसभा अध्यक्षांना उत्तर देण्यासाठी कागदपत्रे आणली. वायकर आता विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गेले आहेत.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. कृषी क्षेत्रांतील योजनांविषयी बोलताना भाजप योजनांची नावे देण्यासाठी
या खुर्चीवर जेव्हा कुणी बसतो तेव्हा तो नि:पक्ष होतो. या परिसरात सभापती कधीच कुठल्या पक्षात प्रवेश करू शकत नाही. कायद्यात कधीच कुठला सभापती पक्षात प्रवेश करू शकत नाही असं शेकापचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
जोपर्यंत सुनावनी सुरू आहे तोपर्यंत ती व्यक्ती या सभागृहातून बाहेर जाऊ शकत नाही. उपसभापतींच्या अपात्रतेचा कुठलाही परिणाम या सभागृहात होत नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह हे शिंदेंना दिलेलं आहे. चिन्ह व पक्ष दोन्ही शिंदेकडेच आहे. हा जो निकाल आलाय तो ज्या अपात्रतेबाबत निकाल आला त्या बद्दल आहे. उर्वरित शिवसेनेच्या सदस्यांनी ओरिजनल पाॅलटिकल पार्टीकडे आलं पाहिजे राष्ट्रवादीने सुद्धा असं देवेंद्र फडणीस उत्तर देताना म्हणाले आहेत.
नैतिक दृष्ट्या नीलम गोऱ्हे यांनी उपसभापतींच्या खुर्चीवर बसणे अयोग्य आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचं अंबादास दानवे विधानपरिषदेत म्हणाले आहेत.
"याप्रकरणी आता निर्णय कोण घेणार आणि उपसभापतींच्या खुर्चीवर कुणाला बसवायचं हा निर्णय घेण्यासाठी समिती नेमवावी" अशी मागणी परब यांनी सभागृहात केली आहे.
सभापतींचे अधिकार काय यासंदर्भात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी या खुर्चीवर बसू नये अशी आम्ही मागणी करत आहोत असंही परब म्हणाले.
न्यूज चॅनलले एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक व्हिडिओ दाखवत असताना काहीतरी बंधने ठेवावेत. त्याचबरोबर या वाहिन्यांकडे जर काही गोपनीय माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांच्या तपासासाठी द्यावी. जेणेकरून ज्या महिलांनी आरोप केले आहेत. त्यासंदर्भात तपास करताना सोपे जाईल. तुम्ही माझ्याकडे पेन ड्राईव्ह दिला आहे पण ते पाहणं माझ्यासाठी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे मी महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर यांना बघायला सांगून त्यांचं मत घेईन असं सभापती म्हणाल्या आहेत.
काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केले आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. माझ्याकडे सोमय्यांचे 8 तासांचे व्हिडिओ आहेत ते मी सभापतींकडे देणार आहे. असा हा भाजपचा नेता म्हणजे किरीट सोमय्या. माझ्याकडे या देशद्रोही नेत्यांच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
सोमय्यामुळे अनेकांचे वैयक्तिक आयुष्य उध्वस्त - अनिल परब
सोमय्या यांच्या त्या कथित व्हिडिओची सत्यता समोर आलीच पाहिजे. त्यांच्या या कृत्यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. राज्य सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. ही विकृती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे. या प्रकरणावर कोणतीही चौकशी लावा पण सत्यता समोर आणा. अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाचे अनिल परब यांनी केली.
हा व्हिडिओ खरा असल्याचं सोमय्या यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे असा दावासुद्धा अनिल परब यांनी विधानपरिषदेत केला आहे.
सोमय्या प्रकरणावर फडणवीसांचे उत्तर
अनिल परब आणि दानवे यांनी मांडलेला प्रकार खूप गंभीर आहे. याप्रकरणी अतिशय सखोल चौकशी केली जाणार आहे. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, तुमच्याकडे तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे द्या आम्ही त्यावर चौकशी करू असं गृहमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले आहेत.
ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत सात लाख झाडे नष्ट केली असून यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास झाला. यासंबंधित शासनाने चौकशी केली आहे का? त्यामध्ये किती झाडे नष्ट झाली आणि किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली? असा प्रश्न लक्षवेधीमध्ये मांडण्यात आला आहे.
झोपटपट्टी विभागात अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे सरकारने या भागातील पोलिसांची गस्त वाढवायला पाहिजे असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलं.
अंमलीपदार्थ विरोधी पथकामध्ये मनुष्यबळ कमी आहे त्यासाठी भरती करणार का? आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यासाठी काही वेगळे धोरणे राबवणार का? अशी दोन प्रश्न पुन्हा रोहित पवारांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना, "या विभागासाठी १८ हजार जणांची भरती काढली आहे त्यामुळे मनुष्यबळाची कमी पडणार नाही." असं फडणवीस म्हणाले.
अंमली पदार्थांच्या किंमती अमर्याद वाढल्या असून अनेक तरूण याच्या आहारी गेले आहेत. जोपर्यंत पोलीस यंत्रणा सतर्क होत नाही तोपर्यंत यावर आळा बसणार नाही. या अवैध धंद्याच्या बाबतीत पोलिसांना सगळी माहिती असते. पण त्यांना अमर्याद अधिकार दिले तर हे बंद होऊ शकते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.
पानवाल्याची दुकाने बंद करा, असे ड्रग्ज विकण्यासाठी पानवाला हा प्रमुख स्त्रोत आहे, त्यामुले पानवाल्यांची दुकाने रात्री ११ वाजता बंद करावेत अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
अंमली पदार्थ तस्करी आणि अवैध कामांविरोधात कारवाई केली जाईल असं उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर प्रशासनातील जे अधिकारी या अवैध कामधंद्यामध्ये सहभागी असतील त्यांना बडतर्फ केलं जाईल असंही ते म्हणाले.
सदस्यांनी शांत बसावे. मला निलंबनाचा उद्योग करायला लावू नका. अशा इशारा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना दिला.
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील -
निलम गोऱ्हे यांच्या अविश्वास ठरावाबाबत जर विरोधकांना प्रस्ताव आणायचा असेल तर त्यासाठी आज विधीमंडळातील गटनेत्यांची बैठक पार पडली. निलम गोऱ्हे यांच्याबाबत हा प्रस्ताव असल्यामुळे आता तलिका अध्यक्ष नेमून ते अविश्वास ठरावाबाबत निर्णय घेतील.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शेकापचे आमदार जयंत पाटील आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या नेत्यांनीही गोंधळ केला आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये गांजा, चरस, एमडी अशा पदार्थांचा सामावेश आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे युवा पिढीमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या गैरप्रकारामध्ये व्हाट्सअपचा वापर केला जातो असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
त्यांच्या लक्षवेधीवर गृहमंत्री देवेंद्र फडणीस उत्तर देत आहेत.
नाना पटोले यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला आहे. ज्या जनतेच्या आणि स्थानिकांच्या भावना आहेत त्यांना समजून घेऊन हा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी पटोले यांनी केली.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी "महाराष्ट्रात २२०० मुली बेपत्ता झाल्या. सरासरी दिवसाला ७० मुली बेपत्ता झाल्या आहेत याबाबत चर्चा घ्यावी" अशी मागणी केली. त्यावर "जे सांगितले जाते ते चुकीचे सांगितले जाते, आपण त्या मुली परत आणतो. जेव्हा गृह खात्यावर चर्चा होईल तेव्हा उत्तर देईन." असं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.
नांदेड येथील दत्ता पाटील हडसणीकर हे मराठा आरक्षणासाठी आणि विविध मागण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेणार आहे असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी संदर्भातील मुद्दा बाळासाहेब थोरात यांनी मांडला आहे.
प्रश्नोत्तराचा टप्पा संपला.
प्रश्न क्र. ५ - पुणे महापालिकेतील सामाविष्ट झालेल्या ३४ गावातील पाण्याच्या संदर्भातील मुद्दा काँग्रेसचे कसबा येथील आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. यासाठी १५०० कोटी रूपये खर्च करण्याचा निर्णय झालेला आहे असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं.
नितेश राणे यांनी किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ क्लीप व्हायरल प्रकरणी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. "स्वतः गावगुंडासोबत बसता आणि कोणत्या तोंडाने भाजपवर आरोप करत आहात? यावर जरा सामनात लिहावे." असं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं आहे.
यशोमती ठाकूर
किरीट सोम्मया यांची एक किळसवाणी क्लिप वायरल झाली आहे. जो माणूस आमदारांना ब्लॅकमेल करतो. काही महिलांना हा व्यक्ती छळतोय. त्या महिलांना आपण सुमोटो संरक्षण देणार आहोत की नाही. त्या वाहिनीवर पण धाड पाडणार का? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी माध्यमांना बोलताना केला आहे.
प्रश्न क्र. ४ - ज्या रूग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत त्यावर काय कारवाई करण्यात आली आहे? असा प्रश्न सुनील राऊत यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.
फायर ऑडिट निधीच्या संदर्भात जेवढे प्रस्ताव आले आहेत त्या सर्वांना निधी उपलब्ध करून दिला जाईल असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.
पहिल्या तीन प्रश्नावर संबंधित मंत्र्यांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तरं दिले नाहीत. तुम्ही फक्त हे प्रकरण न्यायालयात आहेत असं सांगतात. त्यामुळे हे प्रश्न राखून ठेवावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली.
एकही मंत्री समाधानकारक उत्तर देत नाही. कुणीही मंत्री या प्रश्नावर अभ्यास करून येत नाहीत. तुम्ही सर्व मंत्र्यांना ताकीद दिली पाहिजे, त्यांना अभ्यास करून यायला सांगा असं काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विधानसभा अध्यक्षांना म्हणाले आहेत.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणाची सोय बारटीच्या माध्यमातून होण्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
पाथरी येथील बसस्थानकातील स्लॅब कोसळून जखमी झालेल्या प्रवाशांना आर्थिक मदत देण्यासंदर्भातील मुद्दा अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. जखमी प्रवासी आगारात येण्याची वाट न पाहता त्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
तुम्ही सोयीप्रमाणे उत्तर देत आहात. तुम्ही मुंबई संपवण्याचा प्रयत्न करत आहात का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. नाल्यावर अनधिकृत काम करणाऱ्या बिल्डरला मुदत देत आहात. हे बंद होणार का आणि तेथील पाणी समुद्रात जाण्याची सोय करणार का असा प्रश्न त्यांनी मांडला आहे.
अंधेरी सबवे तुंबू नये यासाठी दीड किलोमीटरचा मायक्रो टनलिंग न तयार न करता त्याच्या समोरेचं बांधकामं फ्री करून अंधेरी सबवेचं पाणी मिलानियर इमारतीच्या खाली टाकून अंधेरी सबवेला बंद होण्यापासून मुक्त करणार का? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला गेला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे.
"शेतकरी विरोधी कलंकीत सरकार" अशा आशयाचे पोस्टर धरून विरोधीपक्षातील आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू केले आहे. "खोक्यावर खोके मंत्री झाले बोके", "नालायक किरीट सोमय्याचा धिक्कार असो, बदमाश किरीट सोमय्याचा धिक्कार असो", शेतकर्यांचे केले हाल … मंत्री झाले मालामाल" अशा घोषणा विरोधी पक्षातील आमदारांकडून करण्यात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत.
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जे भाजप संस्कृतीच्या गप्पा मारते त्याच भाजपच्या नेत्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. गृहमंत्र्यांनी याबद्दल चौकशी केली पाहिजे, सभागृहात संधी मिळाली तर मी हा मुद्दा मांडेल असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरूवात होणार असून विधानपरिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. पण आजचा दिवस विविध प्रश्नांवर गाजण्याची शक्यता आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित व्हिडिओ क्लीप प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली असून त्यावरून विरोधक गोंधळ करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकरी, महिला प्रश्न यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन शपथ घेतलेल्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी, बोगस बियाणे, पावसाचे संकट, दुबार पेरणी असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून काही वेळातच विधानसभेचे कामकाज एका दिवसासाठी स्थगित करण्यात आले होते.
विधानपरिषदेत विरोधकांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यांच्या निलंबनासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तर काही वेळाने विधापरिषदेचे कामकाजही कालच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.