Weather Update 
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: महाराष्ट्रात मॉन्सून 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता

पुढील २४ तासांत बिपारजॉय चक्रीवादळाची निर्मिती

धनश्री ओतारी

महाराष्ट्रात मॉन्सून 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील २४ तासांत बिपारजॉय चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या चक्रीवादळामुळेच राज्यात पावसाचं आगमन उशिरा होणार आहे. मात्र, या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांना धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Monsoon Updates imd BIPARJOY Converting to severe cyclonic storm during next 24 hours)

आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार या वादळामुळं येत्या 24 तासांमध्ये कोकणचा किनारपट्टी भाग, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. तर, मुंबई, ठाणे, पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार तीव्र दाबाचा पट्टा 4 किमी प्रतीतास इतक्या वेगानं उत्तरेला पुढे सरकत आहे. सध्याच्या घडीला हे वादळ मुंबईपासून 900 किलोमीटरवर अरबी समुद्रात सक्रिय असल्याचं म्हटलं जात असून, पुढील सहा तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळं वादळाच्या पार्श्वभूमीवर लहान नौका घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमार बांधवाना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रिवादळाच्या एकंदर वातावरणामध्ये कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप, मालदीवसह कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये समुद्र 10 जूनपर्यंत उसळलेला असेल.

याचा परिणाम मान्सूनवर होणार असून राज्यात आणि केरळातही मान्सून लांबणीवर पडला आहे. दरम्यान वादळाच्या काळात होणारा पाऊस हा मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

प्रार्थना बेहरेचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'सखे गं साजणी' सिनेमाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांना उत्सुकता

SCROLL FOR NEXT